ईडी म्हणजे भाजपचे उपकार्यालय; अरविंद सावंत यांचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील ९०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ईडीनं अद्याप ताब्यात घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करत आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी ६ वाजता अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली होती.आनंदराव अडसूळ यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवल्याची माहिती आहे.
ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. ४ तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.
अमित शाह म्हणजे गजनी…
अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. ‘मैने ऐसे कोई बोला नही था’, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा, असं सावंत म्हणाले. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय घडलं होतं, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा रोख अरविंद सावंत यांचा होता.