अर्थ-उद्योग

इटॉनचा एनर्जीअवेअर यूपीस भारतात सादर

मुंबई : जागतिक वीज व्यवस्थापन कंपनी इटॉनने भारतामध्ये यूपीएसला रिजर्वच्या स्वरुपात वापरुन (UPSaaR) उद्योगातले सर्वप्रथम डेटा सेंटर सोल्युशन-एनर्जीअवेअरचा परिचय करुन दिला आहे. या सोल्युशनमुळे डेटा सेंटर्सना पुनर्नवीकरणीय ऊर्जेमध्ये योगदान देण्यासोबत त्यांच्या यूपीएस गुंतवणूकीतून पैसे कमावता येतील. अंदाजानुसार डेटा सेंटर्स त्यांच्या वापरात नसलेल्या क्षमतेसाठी प्रतिवर्ष 60,000 डॉलर्स एमडब्ल्यू पर्यंत कमवू शकतील.

भारतामध्ये कोलोकेशन/त्रयस्थ पक्ष डेटा सेंटर मार्केट सीएजीआरवर 7%-8% दराने वाढत आहे, ज्यामुळे सर्वरची वापराची पातळी उंचावत आहे, सोबत वीजेची आवश्यकता देखील वाढत आहे. एनर्जीअवेअरची रचना डेटा सेंटर ऍप्लिकेशनसाठी करण्यात आली असून, त्याला कोणत्याही उच्च क्षमतेच्या आयटी-लोडमध्ये वापरता येऊ शकते मग ते औद्योगिक असो वा निर्माण क्षेत्र असो.

नवीनतमतेसाठी आपल्या अभूतपूर्व वचनबध्दता, उच्च-मूल्याची समाधाने आणि अग्रणी स्थानामुळे इटॉनच्या एनर्जीअवेअरला भारतीय यूपीएस उद्योगात डेटा सेंटर्ससाठी रिजर्व्ह सिस्टीम म्हणून फ्रॉस्ट ऍंड स्युलिवान यांच्यामार्फत बहुमान मिळाला आहे.

इटॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर- भारत, इलेक्ट्रिकल विभाग सईद सज्जाद अली यांच्या मते, व्यक्ती आणि एक उद्योग म्हणून, वीजेचे वापरकर्ता म्हणून आमच्या भूमिकेला पुन्हा विचाराधीन घेण्याच्या आमच्या बंधनाची आम्हाला संपूर्णपणे कल्पना आहे. डेटा सेंटर उद्योगासमोर कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यात आणि ऊर्जेच्या सक्षमतेला इष्टतम करण्यामध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. इटॉनचे एनर्जीअवेअर तंत्रज्ञान मोठ्या डेटा सेंटर चालकांना ग्रीडला ऊर्जा परत करण्याची संधी देते. यूपीएसची मूलभूत भूमिका बदलत नाही, पण एनर्जीअवेअरने यूपीएसला रिजर्व (UPSaaR) बनवल्यामुळे संस्था ऊर्जा संक्रमण करु शकतात. UPSaaR संस्था त्यांचा कॅपेक्स खर्च कमी करु शकतात तसेच कार्बनचा ठसा कमी करण्यात व पुनर्नवीकरणीय ऊर्जेला सबळता देण्यात योगदान देऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button