Top Newsराजकारण

स्वतःचे आणि कार्यकर्त्यांची घरे भरू नका; सर्वसामान्यांचा उद्धार करा; पंकजांनी धनंजय मुंडेंना सुनावले

अंबाजोगाई : सत्ता ही स्वतःची व कार्यकर्त्यांचे घरं भरण्यासाठी नसते तर ती जनसामान्यांच्या उद्धारासाठी असते. मात्र, बीड जिल्ह्यात सत्ताधार्‍यांना जनतेच्या प्रश्‍नाशी कसलंही सोयर सुतक न राहिल्यानेच नगरपंचायतीच्या निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले असा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला.

केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने गुरूवारी दुपारी आई या त्यांच्या निवासस्थानी बीड जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. प्रितम मुंडे, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, भाजपचे युवानेते अक्षय मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात सध्या विरोधकांबद्दल मी एक बोलते, मात्र ते उत्तर दुसरच देवून जे प्रश्‍न उपस्थितीत केले जात आहेत. त्याकडे दिशाभूल केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्यातील जनता खुप हुशार आहे. ‘कोणाचा पतंग कुठ कापायचा?‘ हे त्यांना बरोबर कळते. यासाठी सत्ता आली म्हणून तिचा गैरवापर न करता तिचा वापर सर्व सामान्यासाठी करा असा सुचक सल्ला पालकमंत्र्यांचे नाव न घेता पंकजा मुंडेंनी दिला नगर पंचायतींचा हा विजयाचा पॅर्टन आगामी काळातही कायम राहणार आहे. मात्र यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पालकमंत्री तुम्ही आहात. तुमच्यावर आरोप करायचं नाही तर कुणावर आरोप करायचा? मग तुम्ही स्पष्ट सांगून टाका मला काही अधिकार नाही, मी नामधारी मंत्री आहे. माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही असं सांगा. पुढची तीन वर्षं मी एकही प्रश्न विचारणार नाही. पालकमंत्री तुम्ही आहात तर जिल्ह्यातील प्रश्न तुम्हालाच विचारणार. आम्ही आणलेल्या रस्त्याचे श्रेय घेण्यापेक्षा स्वत: रस्ते आणा आणि विकास करा. सभागृहात जसं प्रश्नाचं उत्तर देतात तसं जनतेच्या सभागृहात देखील उत्तर द्या.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, आता पुन्हा आक्रमकतेने बीड जिल्ह्यात काम करणार. जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही साम, दाम, दंड वापरून लढणार. तसेच विरोधक म्हणून खडा जवाब आणि कान उघडणी करणार आहे. मी नामधारी आहे असं म्हणा, मग आम्ही तीन वर्षं कुठलाही प्रश्न विचारणार नाही किंवा उत्तर मागणार नाही.

गेल्या अडीच वर्षात पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कसलाही निधी आणला नाही. याउलट माझ्या काळात आणलेल्या निधीच्या माध्यमातूनच विकास कामांचे उद्घाटने सुरू आहेत. बीड जिल्ह्याच्या विकासाचं काय? तुम्ही किती निधी आणला ? असे प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थितीत केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्यातील जनतेची मोठी उपेक्षा सुरू आहे. ना विमा ना अनुदान अशी त्यांची स्थिती झाली आहे. मात्र जनतेच्या या प्रश्‍नावर आपण आक्रमकपणे लढा उभारणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खा. डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी केंद्रातून रेल्वेला मोठा निधी प्राप्त झाला. रेल्वेसाठी आगामी काळातही मोठा निधी उपलब्ध होणार आहे. तर आ.सुरेश धस म्हणाले की, पंकजा मुंडे व खा.प्रितम मुंडे यांनी नविन नगरपंचायतींना केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच हे यश संपादन झाले असल्याचे आ.धस यांनी सांगितले. यावेळी बोलताना आ.नमिता मुंदडा म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील जनतेने नगर पंचायतीच्या निवडणूकीत जशी सर्व नगर पंचायतींमध्ये भाजपाला बहुमत दिले. तोच पॅर्टन जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणूकीत अंमलात येणार आहे. आगामी काळात मुंडे भगिनींचे नेतृत्व सक्षम करण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button