आरोग्य

कोरोनाग्रस्त चिमुकल्यांना स्टेरॉईड, रेमडेसिवीर देऊ नका; आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा २,९१,८३,१२१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९४,०५२ नवे रुग्ण आढळून आले, तर ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ३,५९,६७६ लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या नियमानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांवर सिटी स्कॅनचा उपयोग हा समजदारीने करावा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने (DGHS) या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉईडचा वापर हा घातक असल्याचं म्हटलं आहे. १८ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे असं म्हटलं आहे. रुग्णालयामध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button