प. बंगाल विधान सभा निवडणुकीत २००+ लक्ष ठेवणाऱ्या भाजपचा दीदींनी ‘खेला होबे’ करून टाकत प. बंगालची एकहाती सत्ता राखत भाजपला जोरदार धक्का दिला.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. अद्याप निवडणुकीच्या अधिकृत निकालाची घोषणा झालेली नाही.
बंगालची लढाई जिंकण्यासाठी भाजप आणि टीएमसीने सर्व ताकद पणाला लावली होती. देशात कोरोना विषाणूचा धोका असूनही बंगालमध्ये जाहीर सभा, रॅलींना उत आला होता. भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहापासून अनेक मातब्बर नेत्यांनी जोर लावला होता. त्याचवेळी टीएमसी चीफ आणि बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनीही पायाच्या दुखापतीनंतरही जोरदार प्रचार केला.मात्र ममता दिदींच्या झंझावाता पुढे भाजपचा पराभव कोरोना पोजिटिव्ह सारखा झाला.या निवडणुकीत भाजपला प्राणवायू मिळाला असला तरी भाजप व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचला.
बंगालमधली निवडणूक भाजपने कमालीची प्रतिष्ठेची केली होती. तेथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रचाराची शर्थ केली. या त हे भाजप व विरोधक या दोघांच्याही वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे; त्यामुळेच बंगालमधील प्रचाराला जी धार आली होती, ती दिवसेंदिवस वाढत गेली. बंगालमधील निवडणुका गेली पाच दशके सातत्याने रक्तरंजित होत आल्या आहेत. मग त्या डावे विरुद्ध काँग्रेस असोत, डावे विरुद्ध तृणमूल असोत, की तृणमूल विरुद्ध भाजप असोत. याही वेळी निवडणूक आयोगाने बंगालमध्ये मतदानाच्या आठ फेऱ्या घेतल्या. इतके करूनही हिंसाचार झालाच.या अटीतटीच्या परिस्थितीतही दीदींनी आपला बंगाली गड कायम राखला.
‘खेला होबे…’ हो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मोठा खेळ करुन दाखवला. राज्यात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. कोरोना काळात देशातील परिस्थितीवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. फक्त विरोधकच नाही, तर पक्षाचे कार्यकर्ते आणि अनेक नेतेही पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती आहे. या परिस्थितीत पश्चिम बंगालमधील पराभव भाजपसाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखा आहे.
बंगाल पूर्वोत्तर भारताचे सर्वात मोठे राज्य आहे. विधानसभा जागेंच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर बंगाल आहे. त्यामुळे देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य जिंकणे भाजपसाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते.मात्र दीदींनी भाजपच्या स्वप्नांना मोठा धक्का प.
देत पुन्हा एकदा प.बंगाल पादाक्रांत केला.
या निवडणुकीतदीदींनी ‘खेला होबे’ चा नारा दिला होता. ‘खेला होबे’ चा मराठीत अर्थ ‘खेळ होणार’! या निवडणुकीत रणनितीकार प्रशांत किशोर यांनी रणनीती बनवली असली तरी या ‘खेला होबे’ने संपूर्ण निवडणुकीत विलक्षण उत्साह भरला. हा उत्साह लाखोंचा जनसमुदाय अनुभवताना हे घोषवाक्य जाहीर सभेत आपल्या तोंडून उद्धृत करणं दस्तुरखुद्द मोदींनाही भाग पडलं. ‘खेला होबे’ हे गाणं तृणमूलचे युवानेते देबांगशू भट्टाचार्य यांनी लिहिलं. त्याच्या शब्द आणि सुरांमुळे ते समाजमाध्यमांवरुन विलक्षण लोकप्रिय ठरलं. एरव्ही इव्हेंट करण्यातच रमणार्या पंतप्रधान मोदीं व शहांच्या च्या करिष्म्याचा बेरंग होण्यात ‘खेला होबे’ची भूमिका मोठी आहे. प बंगालच्या निवडणुकीत ‘खेला होबे’ हे घोष वाक्य अत्यंत लोकप्रिय ठरलं.
खेला होबे’च्या चक्रव्यूहात दीदींनी मोदी शहांना अडकवलं व प बंगालची एकहाथी सत्ता कायम राखली.
ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागलं.तृणमूलचे नेते पक्ष सोडून जात असतानाही दीदींनी भाजला निकराचा लढा दिला.भाजप जय श्री रामचा नारा देताच दीदींनी बंगाली अस्मिता बंगालींमध्ये जागृत केली.भाजप व बाहेरच्यांना बंगाल शरण जाणार नाही,असा जोरदार प्रचार प्रचार करत व्हील चेअर वरून बंगलींचा स्वाभिमान,अस्मितेला फुंकर घालत भाजपचा डाव हाणून पाडला.
ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
तृणमुलमधील बडे बडे नेते भाजपच्या गळाला लागूनही तृणमुलने बंगालमध्ये २०० चा आकडा पार केला. मात्र, संपूर्ण पश्चिम बंगाल एकहाती जिंकताना त्यांना स्वत:च्याच मतदारसंघात पराभव स्विकारावा लागला आहे.तरी दीदींनी बंगाल राखला. संपूर्ण ताकद लावून देखील भाजपाला तृणमूल काँग्रेसने दोन आकड्यांवरच रोखून तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. तीन वरून भाजपने प. बंगालमध्ये मोठी झेप घेतली असली तरी भाजपाला दिदींनी हरवलंचं…
‘खेला होबे’ ही केवळ घोषणा किंवा गाणे नव्हे तर ती एक तीक्ष्ण स्टिंग स्लोगन न होते . टीएमसीने या स्लोगनचा वापर बीजेपी विरुद्ध केला. टीएमसी ब्रिगेडने भाजपला चिथावणी देण्यासाठी हे स्लोगन तयार केले होते. ममतांनी विधानसभा निवडणुकात या स्लोगनचा वापर प्रचारासाठी केला … सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस भाजपचा राजकीय खेळ खराब करण्याचा प्रयत्न करीत असून विधानसभेतही २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या यशाचे भांडवल करण्याचा प्रयत्न करीत आहे.हे दिंदीच्या लक्षात येताच दीदींनी भाजपचा ‘फेलो होबे’करण्याचा चँग बांधला.
या घोषणेद्वारे दीदी आणि त्यांच्या पक्षाला सांगायचे होते की यावेळी बंगालमध्ये भाजपबरोबर मोठा खेळ खेळल्या जाणार आहे, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या अपेक्षा वाढल्या होत्या भाजपानेही २००+ चे लक्ष्य ठेवले होते . अशा परिस्थितीत टीएमसीला माहिती होते की प बंगाल यावेळी काहीतरी काही खेळ होईल.म्हणून दीदींनी या स्लोगनच्या माध्यमातून विलक्षण उत्साह भरला भाजपचे प्रयत्न हाणून पाडले.