आरोग्य

आंतरराष्ट्रीय विमानसेवा एप्रिलपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : देशात कोरोना संकट पुन्हा वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंध आणखी एक महिना वाढवण्याचा निर्णय हवाई वाहतूक नियामक महामंडळाने घेतला आहे. त्यामु देशात ३० एप्रिल २०२१ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे.

देशात कोरोनाचे संकट वाढल्याने एक वर्षाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली. याच २०२१ मध्येही युरोप आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट असल्याने भारतीय हवाई वाहतूक मंडळाने आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध आणखी वाढवले. यातच आता देशातही कोरोना रुग्ण वाढल्याने सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार असल्याचे डीजीसीएने ट्वीट करत स्पष्ट केले.

यातच आत्ताही निवडक देशांशी द्विपक्षीय कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु असणार आहे. यात अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान, फ्रान्स यांसह २७ देशांनी केलेल्या द्विपक्षीय करारानुसार सुरु असलेली विमान सेवा कायम राहिल असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

देशात कोरोनामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यासाठी एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होती. यावेळी एअर इंडिया आणि त्यांची सहकारी कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसने यावेळी महत्वाची भूमिका बजावत अनेकांना मायदेशी आणले. या विमान कंपन्यांसह नौदलाच्या जहाजांनी देखील अनेक नागरिकांना मायदेशी सुखरुप आणले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button