मुंबई : राज्यातल्या भाजप नेत्यांच्या सध्या दिल्ली वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. चंद्रकांत पाटील गुरुवारी दिल्ली दरबारी जाऊन आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या राज्यातल्या राजकारण मोठ्या बदलांचे हे संकेत आहेत का? अशा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत गेले असल्याचंही बोललं जातंय.
आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे. त्या दृष्टीने राज्यात किती संघटनात्मक बदल होणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांच्या भेटीत भाजपच्या राज्यातली कामकाजाबद्दल आणि सहकार क्षेत्राबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीत काय दडलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.