राजकारण

पत्र देऊनही फडणवीस, दरेकरांवर अद्याप गुन्हा का नाही? : भाई जगताप

मुंबई : बीकेसी येथे रात्रीच्यावेळी एका गुजरातच्या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेता प्रवीण दरेकर पोहचले होते. ते जाणीवपूर्वक त्या व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. माझं स्पष्ट मत आहे की, या प्रकरणात मोठं गौडबंगाल आहे. त्यामुळे याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी नेमावी; अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक आठवड्यापूर्वी पत्र लिहून केली होती. यासाठी मी स्वतः जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. परंतु एक आठवडा उलटून देखील अद्याप काहीच झालं नाही, असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप विविध प्रश्नांसंबंधी पत्रकारांशी बोलत होते.

माझा सरकारला सवाल आहे की, सचिन वाझे या गुन्हेगाऱ्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो, मग मी पत्र देऊन देखील देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि उपस्थित आमदार यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? अशा शब्दांत भाई जगताप यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. यासोबतच अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील विमानाने १० हजार रेमडेसिवीर घेऊन येतात आणि वाटतात. हा काय प्रकार आहे?, असा सवालही काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.

माझा सवाल केंद्र सरकारला आहे की, इथं महाराष्ट्र सरकारला इंजेक्शन मिळत नाहीत मग भाजपचे हे खासदार हा साठा आणतात कुठून? माझी राज्य सरकरला विनंती आहे की, याप्रकरणी सुजय विखे पाटील यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करावा, असंही ते म्हणाले.

दरम्यान, माजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यावर बोलताना भाई जगताप यांनी हे तर होणारच होतं. आशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. आणखी गुन्हे आगामी काळात दाखल होतील असं देखील जगताप म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button