Top Newsराजकारण

बैलगाडा शर्यतीवरून अजितदादांनी भाजप नेत्यांना सुनावले

राज ठाकरे हा मुद्दा राष्ट्रवादीसाठी संपला...!

बारामती : आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांचेच सरकार होते. केंद्रात देखील त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवल नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी काही करत नाही असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काहींचा सुरू आहे. कायदा तोडून कोणी स्पर्धा भरवत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार. आम्हाला सुद्धा स्पर्धा घेता येतात. मात्र आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैलगाडा शर्यत मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले.

बारामती येथे शनिवारी कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, बैैलगाडा शर्यत सुरू व्हावी अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बैैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. राज्य शासनापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन राज्य शासनाला करावे लागते. बैैल हा प्राणी पाळीव प्राणी न गणला जाता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. हा केंद्र सरकाच्या अखत्यारीतला विषय आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

कोरोना परिस्थिवर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ७०० मेंट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजन लागल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल. कोरोनाचे सावट दुर व्हावे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला सुद्धा वाटते नागरिकांनी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे मात्र जिथे गर्दी जास्त होते. तेथे कोरोना सक्रमणाची प्रकरणे अधिक अढळून येतात. आषाढी वारी दरम्यान पंढरपूर नजीक पायीवारीला परवानगी देण्यात आली. त्यानंतर पंढरपूरमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याचेही दिसून आले. पुणे, पिंपरी-चिंचवड आदी भागामध्ये मागील आठवड्यापेक्षा सध्याचे संक्रमणाचे प्रमाणात बारामती तालुक्यातील कोरोना संक्रमण कमी झाले नाही. मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

राज ठाकरे हा मुद्दा आमच्यासाठी संपला…

उगीच जुन्या कढीला ऊत कशाला आणायचा. या संदर्भात मी बोललो आहे. ज्या लोकांना कुठे थारा राहत नाही. ते अशा प्रकारे बोलातात. आमच्यासाठी तो मुद्दा केंव्हाच संपला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत लवकरच बैैठक…

प्रत्येकाला आपला पक्ष संघटना वाढवण्याची मुभा आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास अघाडी सरकार चालवत आहोत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांच्या बाबतीत वरिष्ठ नेते निर्णय घेतात. मात्र नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आम्ही अधिकार देणार आहोत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि मी आमची एक बैठक नगरपालिका निवडणुकांपूर्वी होईल, त्यामध्ये एकत्र निवडणुकांबाबत ठरवू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button