अर्थ-उद्योगराजकारण

नोटांवरून गांधीजींचा फोटो हटवा, तिथे मोदींचा फोटो लावा; काँग्रेस आमदाराचा सल्ला

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने नोटांची महात्मा गांधी सिरीज सुरू केल्यापासून सर्व नोटांवर महात्मा गांधीचा फोटो छापला जात आहे. दरम्यान, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या एका आमदारांने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी मोदींना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ५०० आणि २००० च्या नोटांवरील गांधीजींचा फोटो हटवून त्या ठिकाणी मोदींनी स्वत:चा फोटो लावावा, आणि त्याखाली ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ हा संदेश लिहावा, असा सल्लाही काँग्रेसच्या या आमदाराने दिला आहे.

याबाबत मोदींना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर छापलेले गांधीजींचे चित्र हटवण्यात यावे, अशी माझी मागणी आहे. कारण या नोटांचा वापर भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो, असे ते म्हणाले. दरम्यान, ५०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटांवर मोदींनी स्वत:चा फोटो लावावा, आणि त्याखाली न खाऊंगा, न खाने दुंगा हा संदेश लिहावा, असा सल्लाही भरत सिंह कुंदनपूर यांनी या पत्रातून दिला. ते म्हणाले की, असे केल्याने भ्रष्टाचार थांबेल. भ्रष्टाचारी नोटा घ्यायला घाबरतील. भ्रष्टाचाऱ्यांमध्ये मोदींनी दिलेल्या इशाऱ्याची भीती असेल. ते चमकतील. कारण मोदींना नोटाबंदीचा पुरेपूर अभ्यास आहे.

गेल्या साडेसात दशकांमध्ये देश आणि समाजात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी एसीबी विभाग आहे. तो आपले काम करत आहे. राजस्थानमध्ये जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात ६१६ ट्रॅप पकडण्यात आले. म्हणजेच राज्यात दररोज सरासरी दोन ट्रॅप लावण्यात आले. ही रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते. यासाठी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा वापरल्या जातात. त्यावर गांधीजींचं चित्र असतं. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो. त्यामुळे गांधीचींचा फोटो हा ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर छापला जावा. या नोटा गरीबांना उपयोगी पडतात. तसेच गांधीजींनीही गरिबांसाठी काम केले होते, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button