मनोरंजन

दीपिका पादुकोणला कोरोनाची लागण

बेंगळुरू : अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. यापूर्वी दीपिका पादुकोणचे वडील जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण कोरोनाबाधित आढळले होते.

मागच्या आठवड्यात दीपिकाचे वडीलांना (प्रकाश पादुकोण) कोरोनाची लागण झाली होती आणि अलीकडेच त्यांची प्रकृती आणखीन बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. आता स्वतः दीपिकाला पादुकोण कोरोनाच्या कचाट्यात अडकली आहे. दीपिकाच्या वडिलांना सतत ताप येत असल्यामुळे बंगळूरच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. माहितीनुसार, दीपिकाच्या वडिलांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे आणि ते रिकव्हर होत आहेत. शिवाय सर्व काही ठिक झाले तर त्यांना २ ते ३ दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दीपिकाचे वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर दीपिकाची आई आणि बहीण अनीशाची कोरोना चाचणी केली आणि ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या दीपिका पादुकोण आपल्या कुटुंबियांसोबत बंगळूरमध्ये आहे. दीपिका आणि तिचे कुटुंबिय जीवघेण्या कोरोनातून मुक्त व्हावे, अशी चाहते आता प्रार्थना करू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button