राजकारण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबोले यांची निवड

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत आज नव्या सरकार्यवाहांची (RSS General Secretary) निवड केली गेली आहे. या पदासाठी भैयाजी जोशी यांच्या जागी आता दत्तात्रय होसबोले (Dattatreya Hosabale) यांची निवड करण्यात आली आहे. हे संघातील दुसरं सर्वाधिक महत्त्वाचं पद मानलं जातं. बंगळुरू येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

२००९ पासून कार्यरत विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी हे या पदावर होते. मात्र, आता याजागी नवा चेहरा आणण्यात आला आहे. आधीपासूनच हे पद दत्तात्रय होसबोले यांच्याकडे जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हे पद महासचिवाच्या बरोबरीचं असतं. संघात सरसंघचालकांचा निर्णय अंतिम मानला जातो. सध्या मोहन भागवत सरसंघचालक आहेत. मात्र, संघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत, तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात, तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाह यांचे थेट लक्ष असते.

संघात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. संघाचे निर्णय घेणारी सर्वोच्च व्यवस्था म्हणून याकडे पाहिलं जातं. दरवर्षी होणारी अखिल भारती. प्रतिनिधी सभेची ही बैठक यंदा बंगळुरूमध्ये सुरू आहे. याच बैठकीत सरकार्यवाह पदासाठी दत्तात्रय होसबोले यांची निवड करुन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बैठकीत तब्बल 450 प्रतिनिधी सामील झाले आहेत. यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मोहन भागवतही उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button