‘सिग्नेचर’ची नवीनतम आवृत्ती ‘सिग्नेट इन्फोटेक’तर्फे सादर
सर्व व्यवसायांसाठी ‘ई-स्वाक्षरी’चे सोल्युशन
मुंबई : जागतिक तंत्रज्ञान उत्पादने व सेवा या क्षेत्रातील ‘सिग्नेट इन्फोटेक’ या कंपनीने ‘सिग्नेचर’ या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी सोल्युशनची नवीनतम आवृत्ती बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. या आवृत्तीमुळे सुरक्षित, कायद्यानुसार वैध ‘ई-स्वाक्षरी’ मिळू शकते. नवीन आवृत्तीमध्ये फार्मा, बायोटेक आणि वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्यांसाठी खास डिझाइन केलेले मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपन्यांना ‘FDA CFR भाग 11’ची मान्यता मिळविण्यात मदत होईल.
‘21 CFR [कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन्स] भाग 11’ हा अमेरिकेच्या ‘एफडीए’ने [अन्न व औषध प्रशासन] इलेक्ट्रॉनिक नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक स्वाक्षर्यांसाठी स्थापित केलेला एक नियमन कायदा आहे.
सिग्नेचर – ‘CFR’ मान्यताप्राप्त मॉड्यूलची प्रमुख वैशिष्ट्ये
· केवळ अधिकृत व्यक्तींना काम करण्याची परवानगी.
· अनोळखी / अतिथी व्यक्तीस परवानगी घेणे अनिवार्य.
· लेखक, पुनरावलोकनकर्ता, मंजुरीदार यांसारख्यांची स्वाक्षरी सेट करण्याची क्षमता.
· टाइमस्टँप्ड ऑडिट ट्रेल.
· प्रत्येक स्वाक्षरीसाठी स्वाक्षरीकर्ता प्रमाणीकरण.
· प्रत्येक स्वाक्षरी व्यवहार पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये संपूर्ण ‘ऑडिट ट्रेल’ आणि ‘डिजिटल फूटप्रिंट’ – आयपी, ब्राउझर, डिव्हाइस, टाइमस्टॅम्प या सर्व गोष्टी नोंदल्या जातात.
या प्लॅटफॉर्मवर स्वाक्षरी केलेली कागदपत्रे सुरक्षित आहेत, इच्छित व्यक्तीने त्यांवर स्वाक्षरी केलेली आहेत आणि कोणत्याही लेखापरीक्षणासाठी ती उपलब्ध असतील, हे या सर्व वैशिष्ट्यांद्वारे सुनिश्चित केले जाते.
‘इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी’, ‘डिजिटल’, ‘नॅशनल आयडी साईन’, ‘बायोमेट्रिक’, ‘लाईव्ह’, ‘फोटो साईन’ अशा विविध प्रकारच्या स्वाक्षरी ‘सिग्नेचर’तर्फे उपलब्ध करून दिल्या जातात. दस्तऐवजीकरणात पूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक स्वाक्षरी व्यवहारामध्ये टाइमस्टँप, आयपी अॅड्रेस, लॅट / लाँग, स्वाक्षरीसाठी वापरलेले ‘डिव्हाइस’ आणि त्याचा ‘ब्राउझर’ या सर्व गोष्टी कॅप्चर केल्या जातात. व्यवसायांना ‘एपीआय’ वापरून त्यांच्या सिस्टममध्ये सॉफ्टवेअर समाकलित करण्यास सिग्नेचरमुळे अनुमती मिळते. ‘कस्टम बॉट्स’ वापरून कंपन्या पुनरावृत्ती असणारे दस्तऐवज अपलोड करण्याचे काम अखंडपणे व स्वयंचलितरित्या करू शकतात. त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाचतो, मानवी चुका टाळल्या जातात आणि मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येऊन मागणीनुसार कामाची गती वाढविता येते.
‘सिग्नेचर’च्या माध्यमातून, वापरकर्ते कोणत्याही ‘डिव्हाइस’वर द्रुतगतीने कोणत्याही वेळी कोठूनही दस्तऐवजांवर स्वाक्षरी करू शकतात. ‘एनक्रिप्शन’ आणि ‘ब्लॉकचेन’सह सर्वोच्च सुरक्षा प्रदान करण्याची सामर्थ्यशाली वैशिष्ट्ये या सोल्युशनमध्ये समाविष्ट आहेत. तसेच, ‘आयपी अॅड्रेस’, ‘ब्राउझर’ व ‘डिव्हाइस’चा तपशील, ‘गूगल मॅप’वरील लोकेशन आणि ‘टाइमस्टॅम्प’ यांसारख्या स्वाक्षरीसंबंधीच्या सर्व तपशीलांचादेखील मागोवा ठेवतो. वेब पोर्टल, अॅप्लिकेशन्स किंवा वेबसाइट यांसारख्या व्यावसायिक प्रणालींमध्ये समाकलित होण्यासाठी यामध्ये तयार ‘एपीआय’ उपलब्ध आहे. ‘क्लाऊड’ आणि ‘ऑन-प्रीमाईस’ या दोन्ही मॉडेल्समध्ये सिग्नेचर वापरता येते.
‘सिग्नेट’च्या या नवीन आवृत्तीच्या सादरीकरणाबाबत भाष्य करताना, ‘सिग्नेट इन्फोटेक’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज हुथीसिंग म्हणाले, “दस्तऐवजांच्या अखंडित डिजिटल स्वाक्षरीच्या यंत्रणेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘सिग्नेट इन्फोटेक’ने ‘सिग्नेचर’ हे उत्पादन स्थापित केले आहे. CFR मान्यतापाप्त हे एक प्रमुख वैशिष्ट्य समाविष्ट करून आम्ही ‘सिग्नेचर’ची नवीन आवृत्ती बाजारात आणली आहे. जगातील कोठेही अस्तित्वात असलेल्या फार्मा कंपन्यांना आपली जीएक्सपी कागदपत्रे या डिजिटल युगात अधिक सुसूत्रपणे व्यवस्थापित करणे व त्यांतील त्रुटी दूर करणे यांमुळे शक्य होईल.”