क्युरेटेड लिव्हिंगद्वारे विद्यार्थ्यांकरिता अव्वल दर्जाच्या वसतीस्थानांची सुविधा
मुंबई : शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसमध्ये राहणे हा विद्यार्थी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून दिव्यश्री समूहाचा भाग असलेल्या क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने आयव्ही लीग हाऊस हा आपला अव्वल दर्जाचा विद्यार्थी वसतीस्थानांचा ब्रॅण्ड आणला असून कंपनीचा ७०६ बेड्सचा प्रमुख प्रकल्प पुण्यातील ताथवडे येथे उभा राहिला आहे. कॅम्पसमध्ये राहण्याचा अनुभव जसाच्या तसा सजीव करणारी जागतिक दर्जाची विद्यार्थी वसतीस्थाने उपलब्ध करून देण्याभोवती आयव्ही लीग हाऊसची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
आयव्ही लीग हाऊस ही अत्यंत चोखंदळपणे तयार करण्यात आलेली विद्यार्थी वसतीस्थान सुविधा आहे, जी विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि पालकांच्या गरजा पुरविते. पुण्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या मध्यभागी वसलेले आयव्ही लीग हाऊस दोन व्यक्तींसाठी ट्विन, तिघांसाठी ट्रिपल तर चार विद्यार्थ्यां क्वॅड अशी जागतिक दर्जाची वसतीस्थाने तर देऊ करतेच पण त्याचबरोबर फूड कोर्ट, कॅफे, लायब्ररी, आऊटडोअऱ स्पोर्टस् अरीना आणि ओपन स्काय लाउंज अशा सेवाही देऊ करते. त्यामुळे या जागा विद्यार्थ्यांची पसंती मिळविणा-या ठरत आहेत. हा ब्रॅण्ड मूलत: शैक्षणिक संस्थांचे अभ्यासाश संबंधित नियम आणि शिस्त, आपल्या पाल्याची सुरक्षितता आणि स्वास्थ्य यांविषयी पालकांना वाटणारी काळजी आणि एका नीटनेटक्या घरात राहण्याची विद्यार्थ्यांची गरज या तिन्ही गोष्टींमध्ये अचूक समतोल साधणारा आहे. आयव्ही लीग हाऊस हे एक क्युरेटेड पॅकेज आहे, जे आपल्या लाभार्थींच्या या तिन्ही वर्गांच्या गरजा पुरविते.
क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि सीईओ जय किशन चल्ला म्हणाले, ‘ग्रेविटास एट लेविटास’ या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच गांभीर्य (Gravitas) आणि मौजमजा (Levitas) या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्याच्या आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये राहणा-यांना गंभीर होण्यामधील आनंद अनुभवण्यास व आनंदाचा अनुभवही गांभीर्याने घेण्यास प्रोत्साहित करत असतो. विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था यांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा आणि आतिथ्यसेवा पुरविण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आयव्ही लीग हाऊसच्या साथीने विद्यार्थ्यांना जगण्याचा एक परिपूर्ण अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.“