होळीच्या दिवशी राज्यात कोरोनाचा भडका; दिवसभरात ४० हजारांवर रुग्णसंख्येचा विक्रम
मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. एका दिवसात १०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १७,८७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २३,३२,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.९५% एवढे झाले आहे. सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,२५,९०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 71 लाख 3 हजार 875 झाली आहे. त्यातील 2 कोटी 33 लाख 2 हजार 453 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत झपाट्याने वाढ
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात तब्बल 6 हजार 923 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 380 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 7 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 6 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 86 टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी थेटच 58 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय.
पुण्यातील गंभीर परिस्थिती
पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 123 आहे. त्यातील 645 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 25 लाख 9 हजार 112 वर जाऊन पोहोचली आहे. तर 22 लाख 770 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकमधील कोरोना स्थिती
नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज 2 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक महापालिका श्रेत्रात 1 हजार 890, नाशिक ग्रामीणमध्ये 917, मालेगाव महापालिका हद्दीत 78 तर जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या 40 रुग्णाचा समावेश आहे. नाशिकमध्ये आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.