आरोग्य

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती कोरोनामुळे खालावली; मुंबईला हलवणार

पुणे : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राजीव सातव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात उपचार करण्यासाठी पोहोचली आहे. परंतु, प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील उपचार हे लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार असल्याची माहिती आहे.

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून २०१४ साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button