संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांचे बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आतापर्यंत शरद पवार, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी यांचे विधानसभा निवडणुका जिंकल्याबद्दल अभिनंदन. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा.’
भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व मंत्र्यांनी राज्यात जोरदार प्रचार केला होता, तरीही बंगाल निवडणुकीत ममतांची जादू अखंड राहिली. निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे सर्व नेते पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, तृणमूल काँग्रेसला त्याचा फारसा फरक पडला नाही.