कलर्सच्या उडारियाँमध्ये रवि दुबे आणि सरगुन मेहता बनले निर्माते
मुंबई : सरगुन मेहता आणि रवि दुबे यांच्यामध्ये अभिनयाचे टॅलेंट भरभरून भरलेले आहे. या दोघांनी स्वतंत्रपणे स्वतःसाठी एक जागा पक्की केली आहे. सरगुनने पंजाबी सिनेमांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे टेलिव्हिजन शो सह, तर रविने टेलिव्हिजन शो, वेब सिरीज आणि बॉलीवूड सिनेमां मधील त्याच्या असाधारण अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता ही सर्जनशील जोडी एका नव्या प्रांतात प्रवेश करत आहेत, ते दोघे निर्माते बनणार आहेत कलर्सवरील त्यांच्या उडारियाँ या शो साठी.
पंजाबच्या मातृभूमीतील एका कुटुंबाच्या आशा व स्वप्नांची हृद्यस्पर्शी कथा असलेला उडारियाँ म्हणजे संधू कुटुंबाची कथा आहे, ज्यांची कॅनडाला स्थलांतरित होण्याचे स्वप्न आहे. अखेरीस, या स्वप्नांचे ओझे त्या कुटुंबाच्या मुली जस्मिन (भूमिका केली आहे ईशा मालवीयने) आणि तेजो (भूमिका केली आहे प्रियांका चौधरीने) यांच्यावर पूर्ण करण्यासाठी येऊन पडते. येथे फतेह (भूमिका केली आहे अंकित गुप्ताने) सुध्दा आहे, जो जस्मिन व तेजो त्यांची महत्वाकांक्षा कशी पूर्ण करतात यात महत्वाची भूमिका निभावणार आहे. उडारियाँ हा शो ही असाधारण पात्रे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करत असलेल्या प्रवासाविषयी आहे, आणि त्यांची आशा कशाप्रकारे भरारी घेते याविषयी आहे.
यावर बोलताना सरगुन म्हणाली, “प्रत्येक सर्जनशील व्यक्तीच्या जीवनात एक क्षण असा येतो की त्यांना काही नवीन साहस, जास्त रोमांचक असे करावेसे वाटते. यावेळी हा क्षण माझा होता जेव्हा मला टेलिव्हिजन शो वर निर्माती बनायचे होते. माझ्या मनात काही कल्पना होत्या, ज्या मला वाटत होते की मी स्क्रीनवर सुंदररीत्या प्रदर्शित करू शकेन, मी याविषयी रवि सोबत चर्चा केली आणि त्याने मला पूर्ण पाठिंबा दिला. माझा उडारियाँ वर पूर्ण विश्वास आहे. माझा माझी कल्पना, माझी पात्रे, आणि त्यांच्या कथा यावर विश्वास होता आणि कलर्सकडे आम्ही ही संकल्पना घेऊन गेलो आणि त्यांना ती खूप आवडली. उडारियाँ मधून मला असे वाटते आहे की माझ्या प्रेक्षकांना मी या विलक्षण नव्या जगाच्या काही झलकी देणार आहे आणि काही चलाख पात्रांचा परिचय करून देणार आहे. मला आशा आहे की लोकांना हा शो आवडेल कारण तो खऱ्या अर्थाने चिकाटीचा व प्रेमाचा शो आहे!”
यावर बोलताना रवि म्हणाला, “टेलिव्हिजन इंडस्ट्रीने आम्हाला खूप काही दिले आहे. आम्ही या इंडस्ट्री मध्ये १५ वर्षे आहोत आणि अनेक कथांवर काम केले आहे. सरगुनचा व माझा स्वतःचा मला अभिमान वाटतो आणि मला आनंदही झाला आहे कारण उडारियाँ पासून आम्ही आता कथाकथनकार बनणार आहोत. उडारियाँ ही सरगुनची निर्मिती आहे, त्याची संकल्पना व विकास तिचा स्वतःचा आहे. हा शो बनवण्यासाठी तिने दिवस रात्र कष्ट केले आहे. आणि तिचा प्रामाणिकपणा व उत्सुकता प्रत्येकाचे हृद्य जिंकेल याची मला खात्री आहे. मला तिचा नेहमीच अभिमान वाटतो. आजपर्यंत आम्ही साकारलेल्या सर्व पात्रांवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि मला आशा आहे की आम्ही निर्माते बनल्यावर सुध्दा ते तशाच प्रेमाचा वर्षाव आमच्यावर करत राहतील”.