स्पोर्ट्स

चेन्नईची आयपीएलसाठी मुंबईत तयारी

मुंबई : आयपीएलच्या (IPL) 14 व्या मोसमासाठीची तयारी सगळ्या फ्रेचायझींनी सुरु केली आहे. आयपीएलचा 14 वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 13 वा आयपीएल हंगाम दुबईमध्ये खेळला गेला होता. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्लीला (Delhi Capital) हरवून बाजी मारली होती. या सिझनमध्ये चेन्नईचं Chennai Super Kings) प्रदर्शन खूपच खराब राहिलं होतं. आता 14 व्या सिझनसाठी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात ट्रेनिंग कॅम्प सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून चेन्नईत सुरु असलेला ट्रेनिंग कॅम्प आता मुंबईला होणार आहे. जिथे त्यांना आयपीएलचा पहिला सामना खेळायचा आहे.

चेन्नई सुपर किंग्जने 10 मार्चपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. सरावादरम्यान धोनी अनेक लांब षटकार मारतानाही दिसला होता, पण आता धोनी आणि त्याच्या साथीदारांना चेन्नई सोडून मुंबईला जावे लागेल. धोनी सीएसकेला सोडून जात नाही तर चेन्नईचा इथून पुढचा ट्रेनिंग कॅम्प मुंबई येथे होणार आहे. चेन्नईचे सीइओ काशी विश्वनाथ यांनी सांगितलं, आम्ही आमचा ट्रेनिंग कॅम्प चेन्नईवरुन मुंबईला हलवत आहोत. 26 मार्च रोजी आम्ही मुंबईला पोहोचू. तर टीमचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना 26 तारखेला थेट मुंबईला येऊन संघाला ज्वाईन करेन. त्याअगोदर सुरैश रैना काही दिवस क्वारन्टाईन असेल. रैनाने कौटुंबिक कारण देत आयपीएलच्या 13 व्या मोसमातून माघार घेतली होती.

आयपीएलचा 13 वा सीझन चेन्नईसाठी फारसा चांगला नव्हता. बाद फेरीतच चेन्नईचा गाशा गुंडाळून घरी जावं लागलं होतं. हा चेन्नईसाठी आणि चेन्नईच्या फॅन्ससाठी खूप मोठा धक्का होता. कारण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सीएसकेची टीम बाद फेरीत ‘बाद’ झाली नव्हती. 2020 च्या आयपीएल सीझनमध्ये पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला जबर धक्का बसला होता. मात्र आता 2021 च्या मोसमात धुमधडाका करण्यासाठी धोनीची टीम पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button