स्पोर्ट्स

चेन्नई सुपर किंग्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६९ धावांनी विजय; जाडेजाची अष्टपैलू कामगिरी

मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामातील १९व्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर ६९ धावांनी शानदार विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. चेन्नईने बंगळुरुला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुला ९ विकेट्स गमावून १२२ धावाच करता आल्या. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

रवींद्र जाडेजाने या सामन्यात बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग या तिनही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. जाडेजाने २८ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ६२ धावा ठोकल्या. विशेष म्हणजे जाडेजाने सामन्यातील २० व्या षटकात ५ षटकार आणि एका चौकारासह शानदार ३६ धावा चोपल्या. तसेच गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. तसेच डॅनियल ख्रिस्टियनला रनआऊट केले.

बंगळुरुला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईने या मोसमात आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी चेन्नईने ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूने आतापर्यंत सलग चार सामन्यात विजय मिळवला होता, तर चेन्नईने दिल्ली विरुद्धच्या पहिल्या लढतीत पराभव स्विकारल्यानंतर सलग तीन विजय मिळवले होते. या विजयासह चेन्नईने पाच पैकी चार सामन्यात विजय मिळून ८ गुण आणि प्लस १.६१२ नेट रनरेटसह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. तर या हंगामातील पहिल्या पराभवानंतर बेंगळुरू ८ गुण आणि प्लस ०.०९६ रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलमधील सर्वात महाग षटक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाने वादळी खेळी केली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने १९ षटकात १५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर २० षटकात त्यांनी १९१ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्ज जास्ती जास्त १७० धावांपर्यंत मजल मारेल असे वाटले होते. आरसीबीकडून १९वे षटक या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता. चेन्नईकडून जडेजा स्ट्राइकवर होता. या अखेरच्या षटकात जडेजाने इतिहास घडवला आणि सामन्याचे चित्रच बदलले. त्याने हर्षलला पाच षटकार आणि एक चौकार व दोन धावा अशा ३७ धावा केल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button