नवी दिल्ली – बारावीनंतर तंत्रशिक्षणात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणयासाठी जेईई मेन्स ही परीक्षा द्यावी लागते. देशभरात चालू असलेल्या जेईई (मेन्स) परीक्षेत २०२१ मध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुरुवारी देशातील २० ठिकाणी छापे टाकले. एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. या दरम्यान, सीबीआयची टीम दिल्ली-एनसीआर, पुणे, जमशेदपूरसह अनेक शहरांमध्ये पोहोचली आणि संस्थेशी संबंधित ठिकाणे शोधत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने १ सप्टेंबर रोजी खासगी शिक्षण संस्था चालवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कंपनीचे संचालक, ३ कर्मचारी आणि इतर अनेकांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. असा आरोप आहे की या लोकांनी देशात चालू असलेल्या जेईई (मेन्स) परीक्षेत २०२१ मध्ये अनियमितता आढळून आली आहे. याची चौकशी करत सीबीआयनं आज छापेमारी करत तब्बल ७ जणांना ताब्यात घेतलं आहे.
या शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि केंद्र सहकारी हे या परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी मदत करत होते. या प्रकरणात एक कंपनी, संचालक आणि तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस करत आहेत.