नवी दिल्ली : सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. मात्र, या मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे, असं राऊत म्हणाले. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचं नेतृत्त्व करते. हा गुन्हा सुडाच्या आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून दाखल करण्यात आला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
FIR registered against me in Delhi has been done with political motives & to suppress my voice. It has been done to defame my party as CBI, I-T, ED can't be used against me. I'm an MP, it's not right to encourage some to register false complaints against me: Sanjay Raut, ShivSena pic.twitter.com/eNR3bf5Egb
— ANI (@ANI) December 13, 2021
महाराष्ट्रात तुम्ही काही करु शकत नाही. यंत्रणा माझ्या विरोधात बोलू शकत नाहीत. हे अशा प्रकारचे हातखंडे वापरून आमच्या विरोधात एफआयर दाखल केली जाते. मी त्यांना सांगू इच्छितो की ही शिवसेना आहे त्यांनी लक्षात ठेवावं, असं संजय राऊत म्हणाले.सध्या संसदेचं सत्र सुरु आहे. माझ्यावर एफआयर दाखल करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, संजय राऊत म्हणाले.
An FIR has been registered against Shiv Sena MP Sanjay Raut at Delhi's Mandawali PS under Sections 509 & 500 of IPC for his alleged objectionable remarks against female BJP members, on the complaint of a woman BJP worker: Delhi Police pic.twitter.com/OkXyPcbH7l
— ANI (@ANI) December 13, 2021
कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कोणी म्हटलं नव्हतं. देशात विरोधकांची एकता होण्याची गरज आहे. मी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत असतो. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करु शकतात. विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी गुन्हा दाखल केला असावा. मी देशाच्या हितासाठी बोलत राहणार असं संजय राऊत म्हणाले. संसदीय लोकशाहीत विरोधक महत्वाचे असतात.