Top Newsराजकारण

कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही !

संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला

नाशिक: सरकार पाडण्याच्या वल्गनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा असं सांगतानाच कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून… चोची तुटून जातील. मात्र हे सरकार काही पडणार नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा टोला लगावला. डोमकावळे कितीही फडफडले तरी त्यांना काही महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार आहे. महाविकास सरकार आणण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या, त्याला यश आलं. पुलोदनंतर प्रथमच महाराष्ट्रात असा प्रयोग घडला. पुलोदचे शिल्पकार शरद पवार आपल्यासोबत आहेत. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना भक्कम पाठिंबा, असं सांगतानाच ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. अनेक वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत, असं राऊत म्हणाले.

डोमकावळे कितीही फडफडले तरी त्यांना काही महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार आहे. महाविकास सरकार आणण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या, त्याला यश आलं. पुलोदनंतर प्रथमच महाराष्ट्रात असा प्रयोग घडला. पुलोदचे शिल्पकार शरद पवार आपल्यासोबत आहेत. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना भक्कम पाठिंबा, असं राऊत म्हणाले.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष आहोत आम्हाला कसं काय कुणी शिकवून चालेल. बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, पळून नाही गेलो. तुम्हीच पळून गेलात. काश्मिर खोऱ्यात जे हिंदुंचं हत्याकांड सुरु आहे. बांग्लादेशात जे हिंदुंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. त्या हिंदुंना संरक्षण देण्याबाबत आजच्या सामनातील अग्रलेखात प्रश्न उपस्थित केलाय, असं राऊत म्हणाले.

भुजबळ सेनेत असते तर सर्वोच्च स्थानी असते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे भुजबळ काँग्रेसमध्ये गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते, असा किस्सा विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांना त्याबाबत छेडले असता त्यांनीही भुजबळांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यांनी छगन भुजबळांविषयी विचारलेल्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवण्यात आलं आहे. असे अनेक लोकं आहेत दुर्देवी, ज्यांनी शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात गेले. पण त्यांच्या नशिबी काय आलं शेवटी? ठिक आहे. कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झाला असेल, पण शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते, असं राऊत म्हणाले.

सोमय्या मोदींच्या गुरुंचा अपमान करत आहेत

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत, या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून सोमय्यांना स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार पाठवला. मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे परग्रहावरून आलेत का? ते देशाचे मोठे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहित नसेल म्हणून सांगतो, मोदी पवारांना गुरु मानतात. मोदींनी जाहीरपणे सांगितलं आहे. मोदी म्हणले पवारांचं बोटं धरून मी राजकारणात आलो आहे. एका अर्थाने सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. सोमय्या मोदींच्या गुरुंचा अपमान करत आहेत, असंच म्हणावे लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. परमबीर सिंगाला कोणी पळवलं देशातून? केंद्राच्या परवानगीशिवाय एखादा अधिकारी पळून जाऊ शकतो का? सोमय्यांना एवढं जर माहीत नसेल तर हिमालयात जाऊन बसा म्हणावं, असं ते म्हणाले.

अमित शाह यांनी काश्मीरमध्येच थांबावे

सध्या जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदुंना लक्ष्य केलं जात आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशातही हिंदू वस्त्यांवर हल्ले केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी अमित शाहांनी काही दिवस काश्मिरमध्येच राहावं, अशी टिप्पणी केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मिर दौऱ्यावर आहेत, असं एका पत्रकारानं म्हटलं. त्यावर संजय राऊत यांनी लगेच ‘चांगली गोष्ट आहे. त्यांनी तिथेच राहावं काही दिवस. अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button