मास्को : युक्रेनचे दोन भाग करून रशियाने अमेरिकेसह नाटोला शह दिला असून आपले सैन्यही युक्रेनमध्ये घुसविले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे पश्चिमी देशांमुळे करावे लागल्याचा आरोप केला आहे. या विरोधात ब्रिटनने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
रशियाने लुहान्स्क आणि डोनेटस्कला स्वतंत्र घोषित करत युक्रेनचा लचका तोडला आहे. यावर आता जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, पुतीन यांनी आता भविष्यातील गोष्टींसाठी तयार रहावे. जर युद्ध झाले तर ब्रिटनचे ४४ दशलक्ष पुरुष, महिला आणि मुलांचे एकच लक्ष्य असेल ते म्हणजे युद्ध लढणे.
ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी रशियन सैन्याने प्रतिक्रिया दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसविण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडमधील लीसेस्टरशायर येथे मंगळवारी झालेल्या बाल्टिक आणि उत्तर अटलांटिक राज्यांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत वॉलेस यांनी इशारा दिला की, युद्ध सुरू झाल्यास रशियन सैन्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. युक्रेन हे एक सार्वभौम राज्य आहे, परंतु रशियाने ते जबरदस्तीने तोडले आहे.
दरम्यान, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी सांगितले की, जर्मनीने रशियासोबतचा नॉर्ड स्ट्रीम २ पाइपलाइन प्रकल्प स्थगित केला आहे. ब्रिटनने रोस्सिया बँक, आयएस बँक, जनरल बँक, प्रोमस्वायाझ बँक आणि ब्लॅक सी बँकांना दिलेली मान्यता रद्द केली आहे. याचबरोबर रशियाचे अब्जाधीश उद्योगपती गेन्नेडी टिमचेंको, बोरिस रोटेनबर्ग आणि इगॉर रोटेनबर्ग यांच्या ब्रिटन आणि युकेतील एन्ट्रीवर बंदी आणली आहे.
अमेरिका अॅक्शन मोडवर; आर्थिक रसद तोडणार, व्यापारी प्रतिबंधाची घोषणा
रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी देशाला संबोधित केलं. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या तणावार बोलताना बायडन यांनी आम्ही स्थितीचा आढाव घेत असून संरक्षणात्मक पावलं उचलली जात असल्याचं जाहीर केलं. बायडन यांनी दोन रशियनं वित्तसंस्थांवर प्रतिबंध लावत असल्याची घोषणा केली. रशिया आता पश्चिमेकडील देशांशी व्यापार करु शकणार नाही, असंही बायडन यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे अजून काही गोष्टी आहेत त्यावर देखील पावलं उचचलली जातील, असं बायडन यांनी स्पष्ट केलं. आता पश्चिमी देशांकडून रशियाला मिळणारं सहकार्य आणि मदत देखील थांबवली जाईल, असं बायडन यांनी स्पष्ट केलं आहे.
रशियाकडून वारंवार आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे. युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात असल्याचं दिसून येत आहे. बायडन यांनी आम्ही गेल्या दोन दिवसात बैठका घेतल्या आहेत. रशियाशी युद्ध करण्याचा आमचे मनसुबे नाहीत. रशियानं युक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. आम्ही रशियाच्या पुढच्या हालचालीवर नजर ठेऊन आहोत. यूक्रेनच्या राष्ट्रपतींसोबत सातत्यानं बातचीत सुरु असल्याचं बायडन म्हणाले. आम्ही रशिया आणि यूक्रेन वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. रशिया यूक्रेन यांच्यातील तनाव कमी करावा, वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरु राहील, असं बायडन म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी युद्धाच्या शक्यतेमुळं निर्माण झालेला तणाव हा जागतिक दृष्ट्या योग्य नसल्याचं म्हटलंय. जर युद्ध झालं तर हा प्रश्न केवळ दोन ते तीन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चेचा मार्ग खुला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. बायडन यांनी चर्चेती तयारी दर्शवली आहे. सोमवारी व्हाईट हाऊसनं बायडन आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते, पण रशियानं युक्रेनवर हल्ला करु नये ही पूर्व अट असेल, असं सांगंण्यात आलं होतं.
रशियानं युद्ध केल्यास युक्रेनचं महिला सैन्यही सज्ज
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. एकीकडे अमेरिकेसह सर्व नाटो देशांनी रशियाच्या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांनी या संपूर्ण वादावर तटस्थ भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. रशियाच्या निर्णयामुळे फ्रान्स, अमेरिका, जर्मनी रशियाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही या घटनेनंतर आपत्कालीन बैठक बोलवली आहे. याचं अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिलेय. भारतही आपली भूमिका या बैठकीत मांडणार आहे.
युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र युक्रेनदेखील रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. युक्रेनचं महिला सैन्यही सज्ज झालं आहे. तसेच युक्रेनमध्ये एकाएकी महिला सैन्यात सहभागी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. देशाच्या संरक्षणार्थ या महिला त्यांची कुटुंबही मागे सोडून धाडसी पाऊल उचलताना दिसत आहेत. युक्रेनमधील महिला आता प्राथमिक युद्धाभ्यास, शस्त्र चालण्याचं प्रशिक्षण, स्वसंरक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत. पुरुष सैन्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची ही तुकडी सध्या देशाच्या रक्षणालाठी पाय घट्ट रोवून उभी असल्याची माहिती समोर आली आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे कथित उल्लंघन केल्याबद्दल रशियाचा निषेध केला आहे. जपान रशियावर निर्बंधांसह इतरही कारवाई करण्याचा विचार करू शकतो असा इशारा दिला आहे. रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं मत अमेरिकेकडून व्यक्त केलं जात होतं. त्यांचा दावा आहे की, सुमारे 1 लाख रशियन सैन्य गेल्या आठवड्यापासून युक्रेनच्या सीमेजवळ तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया थंड वातावरण पाहता युक्रेनभोवतीचा बर्फ वितळण्याची वाट पाहत आहे.