आरोग्य

ब्रेक द चेन : नवी मुंबईत नवे निर्बंध

नवी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे अनलॉक सुरु असताना दुसरीकडे मात्र, काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यात कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स येत आहेत. यामध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढत आहे. यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत नवे निर्बंध लागू करण्यात आले असून सोमवारपासून निर्बंध लागू होतील.

सोमवारपासून नवी मुंबईत स्टेज ३ नुसार नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जारी केले आहेत. नव्या आदेशानुार दुकानं चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार. तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला मंजूरी असणार आहे.

काय बंद, काय सुरु?
– सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार.
– अत्यावश्यक सेवा, कृषी विषयक सेवा दुकाने संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील, तर उर्वरीत सर्व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद असतील.
– सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.
– शाळा, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे.
– रेस्टॉरंट, उपहारगृह सोमवार ते शुक्रवारदरम्यान, सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के जेवणाच्या क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे.
– शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद असतील.
– खासगी/शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह सुरु ठेवता येणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button