गोविंदालाही कोरोनाची लागण
मुंबई : ‘खिलाडी’ अक्षय कुमार पाठोपाठ आता अभिनेता गोविंदालाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वारंटाईन असून घरीच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गोविंदाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. ‘मोठ्या सावधगिरीनंतरही गोविंदा कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि तो होम क्वारंटाईन आहे’, अशी माहिती गोविंदाच्या प्रवक्याने दिली आहे.
गोविंदाने रविवारी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या तो होम क्वारंटाईन असून घरीच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गोविंदाची पत्नी सुनिता काही आठवड्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. आता तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. पण गोविंदाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गोविंदाने संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्विट अक्षय कुमार याने केले आहे.