Top Newsराजकारण

भाजपला उत्तर प्रदेशात ३०० हून अधिक जागा मिळणार : अमित शाह

नवी दिल्ली : यावेळी उत्तर प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा मोठा मुद्दा आहे. भाजपने राज्यातील प्रशासनामध्ये व्यापक बदल केला आहे. आधीची सरकारं जातीयवादावर चालत असत, मात्र आता तसे होत नाही. उत्तर प्रदेशात भाजपचेच सरकार बनणार असून, भाजपला या निवडणुकीत ३०० हून अधिक जागा मिळतील असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक अटीतटीची होत असून, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष भाजपला जोरदार टक्कर देत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशची सत्ता राखणे भाजपला जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये काय निकाल लागणार आणि भाजप किती जागा जिंकणार, अशी विचारणा अमित शाह यांच्याकडे केली असता ते बोलत होते. एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी हा दावा केला आहे.

अमित शाह म्हणाले की, मी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा करून आलो आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासह भाजपचे सरकार सत्तेवर येईल. योगींच्या नेतृत्वाखाली जनतेचं मन जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता भाजपसाठी विजयी चौकार भाजपा मारणार आहे. ओपिनियन पोलमधून जो अंदाज मांडला जातो, तो अनेकदा महत्त्वपूर्ण ठरतो. मात्र सर्वेमध्ये जे सांगितले जाते, ते खरं होईल, असं म्हणणं आवश्यक नाही आहे. आम्ही उत्तर प्रदेशात ३०० हून अधिक जागा जिंकणार आहोत, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. एकूण सात टप्प्यान निवडणूक होत असून, त्यातील तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून, १० मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button