संजय राऊत यांच्या ‘इतिहासा’वर भाजपचा पलटवार
मुंबई : भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरुन, आता भाजप-सेना आमनेसामने आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी, बोलताना भाजपवरही निशाणा साधला. त्यामुळे, भाजप-सेना शाब्दीक युद्ध रंगलं आहे. त्यातच, संजय राऊत यांनी सांगितलेल्या इतिहासावरुन भाजपने पलटवार केला आहे.
पक्ष प्रमुख मा. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला स्व, स्वार्थ, आणि स्वपदे महत्त्वाची वाटत असल्याने युतीत सडल्यासारखे वाटतेय! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/GKMVhdHVs6
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 25, 2022
तुम्ही कार्टून काढून पळ काढणार? आणि तुमचं कार्टून समाज माध्यमातून पाठवले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडणार? दुटप्पी भूमिका घेऊ नका! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @poonam_mahajan pic.twitter.com/kW8RE18YsN
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 25, 2022
स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जी युती टिकवली त्या युतीत स्वार्थासाठी मिठाचे खडे कुणी टाकले? @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/r10WBlArZx
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 25, 2022
शिवसेना जन्म सन १९६६ सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन १९६१ साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो. आमचे दोन नगरसेवक कानिटकर आणि कोरडे हे १९५७ साली मुंबईत निवडून आले, असा इतिहास भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितला आहे. तसेच, शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावरही प्रहार केलाय.
…याकूब मेमनला फाशी नको म्हणणारा मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात कसा? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/wCWwcq9Ow7
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 25, 2022
सन १९६७ ला हशु अडवाणी चेंबूरमधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. तुमचे पहिले आमदार वामनराव महाडिक १९७० साली परळमधून निवडून आले, तेही आमच्या पाठींब्यावर. त्यामुळे उगाच सोईने इतिहास उगळू नका. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हिंदुत्ववाच्या विचारांसाठी युतीत ‘आम्ही गर्व से कहो’ म्हणत होतो. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र या जाज्वल्य इतिहासाच्या फुलांचे निर्माल्य झाले वाटतेय ! इतिहासाचा अर्थ केवढा जाच्यात्याच्या समजूती एवढा!, असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.
संजय राऊतांसारखा ‘खुशामतगिर’ पुन्हा होणे नाही; राम सातपुतेंचा खोचक टोला
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा करतानाच अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न मोदींनी नाही तर न्यायालयाने सोडविला. त्यामुळेच मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केले, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर आता भाजपने राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं’ असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी निशाणा साधला आहे.
राम सातपुते यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘जनाब संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं, कारण आपल्या सारखा ‘खुशामतगिर’ परत होणे नाही. कदाचित त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यू’ काय असते? हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हिस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे’ असं सातपुते यांनी म्हटलं आहे.
‘असो, महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहत चला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा यासाठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचित नेहमी वंचितच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात’ असं देखील सातपुते यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचे योगदान ऐतिहासिक कार्य आहे. जेव्हा रामजन्मभूमीचा हा लढा थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याने वातावरण परत एकदा जागृत केले आणि सरकारला जाग आणली. त्यामुळे अयोध्येशी आमचा काय संबंध आहे, हे रामाला माहिती आहे. जेव्हा अयोध्येचे आंदोलन झाले तेव्हा कोणताही राजकीय पक्ष नव्हता. आमचे अनेक प्रमुख लोक तेव्हा इथून गेले होते. त्याचे संपूर्ण नियोजन मुंबईतून होत होते. आज कोणी काही म्हणत असले तरी इतिहास आहे. दस्तावेज, रेकॉर्ड्स आहेत. विशेष न्यायालयासमोरील साक्षी-पुरावे आहेत. लालकृष्ण अडवाणींसोबत बाळासाहेब ठाकरे हे त्यातले आरोपी आहेत. मग ते न्यायालय मूर्ख होते का, असा प्रश्नही केला आहे.
======