Top Newsराजकारण

दादरचे शिवसेना भवन तोडण्याची भाजप नेत्याची चिथावणीखोर भाषा

मुंबई : भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. शिवसेनेवर प्रसाद लाड यांच्यासह नितेश राणे यांनी देखील घणाघाती टीका केली.

दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत.मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला. शिवसेनेला वाटत की आम्ही माहिममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी यावेळी केलं.

माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान ५ नगरसेवक निवडून आणणार आहोत, असं प्रसाद लाड म्हणाले. किल्ला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही ते म्हणाले. शिवसेनेला ताकद देण्याचं काम आम्ही केलं आता त्यांची ताकद तोडायचे काम आम्ही करणार असा इशाराही त्यांनी दिला. पुढच्या वेळी आम्ही इतके कार्यकर्ते घेऊन येणार नाही. आमच्या कार्यक्रमाला पोलीस इतके असतात मात्र आम्हाला त्याची गरज नाही. पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये यावं, असंही प्रसाद लाड म्हणाले.

शिवसेना भवन म्हणजे कलेक्शन ऑफिस : नितेश राणे

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली.

माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.

भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे. आम्हाला भवन फवनचा फरक पडत नाही. मुंबईत आम्ही कुठेही काम करू शकतो. बंदी आहे का? असा सवाल त्यांनी केला.

सदा सरवणकर यांचे प्रत्युत्तर

शिवसेनेची शाखा म्हणजे आम्ही मंदिर मानतो. त्यातून लोकांची सेवा करतो. भाजपानं सुद्दा शाखेच्यामध्यामातून समाज सेवाचं करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाहीय हे समजावं. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते. शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणी वाकड करु शकत नाही.
सेनेवर आरोप करणारी व्यक्ती वैचारिक दिवाळखोरी असलेली आहे. दादारमधील लोकांना समाजसेवाची गरज आहे युद्धाची नाही. छत्रपतींच्या नावचा वापर भाजपकडूनही केला गेला आहे.महापालिकेची स्वप्न यांनी बघू नव्हेत, असं शिवेसना आमदार सदा सरवणकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button