Top Newsराजकारण

अखिलेश यादव यांच्याविरोधात अर्ज दाखल करताच भाजप नेते बघेलांचा इशारा

मैनपुरी : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते एसपी सिंह बघेल यांनी करहल मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एवढेच नाही, तर आपण समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या अध्यक्षांविरुद्ध निवडणूक जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय कायदा राज्यमंत्री बघेल अर्ज दाखल केल्यानंतर म्हणाले, अमेठी आणि कन्नौजचे किल्लेही ढासळताना बघितले आहेत आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. अचानकपणे, कोणतीही घोषणा न करता, करहल येथून उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात त्यांना विचारले असता, बघेल हसले आणि म्हणाले, ते मिलट्री सायंसचे प्राध्यापक आहेत आणि युद्धात सरप्राइजचे अत्यंत महत्व असते.

यापूर्वीही आपण यादव कुटुंबाविरुद्ध लढला आहात. आपला अनुभव पाहून भाजपने आपल्याला अखिलेश यादव यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे का? यावर बघेल म्हणाले, हायकमांडला विचारा की, त्यांनी मला या जागेवर का उतरवले आहे. पण समाजवादी पक्षाने आपला क्रमांक एकचा उमेदवार येथून उतरवला असेल, तर भाजपने काहीतरी विचार केलाच असेल. ही निवडणूक मी कार्यकरत्यांच्या आणि संघटनेच्या बळावर आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने लढणार आहे.

तत्पूर्वी, समाजवादी पक्षाचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजच (सोमवारी) मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिलेश यांना शह देण्यासाठी भाजपनेही मोठा डाव लावला आहे. भादपने अखिलेश यांच्या समोर केंद्रीय कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांना उभे केले आहे. एसपी सिंह बघेल हे आग्र्याचे खासदारही आहेत.

करहलमधून केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिल्यानंतर यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट केले आहे की, ‘करहलमधून भाजप जिंकेल, प्रो एसपी सिंह बघेल जिंकतील, २०२२ मध्ये यादव अखिलेश करहलमधून पराभूत होतील, भाजप जिंकेल, कमळ फुलेल, सुशासन राहील, विकास सुरूच राहील.’

दरम्यान, करहल मतदारसंघातून भाजपाने अखिलेश यादव यांच्याविरोधात एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे. बघेल हे एकेकाळी मुलायम सिंह यादव यांचे सुरक्षा अधिकारी होते. याशिवाय, ते यूपी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button