राजकारणसाहित्य-कला

गिरीश कुबेर यांच्या विरोधात भाजपकडून तक्रार

पुणे : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra) या पुस्तकावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

“नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून काढीत संभाजी महाराजांचा सत्य जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला हे सर्वश्रुत आहे. मग संभाजी महाराजांबद्दल अस्सल ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असताना गिरीश कुबेर यांनी खोटी माहिती आपल्या ग्रंथात समाविष्ट का केली? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे”, असं महेश पवळे म्हणाले.

“महापुरुषांविषयी खोटी माहिती देणे समाजात असंतोष निर्माण करू शकते हे एका जेष्ठ पत्रकाराला का समजू नये? कि त्यांनी ते जाणीवपूर्वक केले आहे? याबाबत सखोल तपास होण्याकरीता लेखक गिरीश कुबेर व पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई होणे समाजहिताचे आहे”, असे महेश पवळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय. यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button