विज्ञान संस्था, सैन्यदल, दुतावासामध्ये हेरगिरीसाठी ‘हनी ट्रॅप’ केला जातो; पण आता ‘हनी ट्रॅप’ अगदी सामान्यांसोबतही होत आहे. ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून युजर्स तरुणांचे आर्थिक व तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत आहेत. एक चूक अंगलट आल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने अशा ट्रॅपपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबईसह राज्यात हनी ट्रॅपच्या (Honey Trap) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसत आहे. काही टोळ्या तरुणींच्या मदतीने अनोळखी तरुणांना स्वतःच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांची संपूर्ण टोळी या तरुणांना किडनॅप करते आणि मग सुरु होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारा एक तरुण अशाच प्रकारे हनी ट्रॅपचा शिकार झाला होता. सुदैवाने त्याचा मित्र आणि वकील नितू सिंग यांनी वेळीच त्याला मदत केली आणि तरुण या ‘हनी ट्रॅप’मधून सुटू शकला. पैशांसोबतच त्याचा जीवही वाचला.
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात हनी ट्रॅप होत आहेत असं नाही. मोठ्या शहरांमध्ये व्हिडीओ कॉल करुन करुन हनी ट्रॅप करतात,व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते, या प्रकरणांमध्ये या महिला दिल्ली किंवा उत्तर भारतातील शहरांमधील असल्याचं दिसून आलं आहे. अखेर हनी ट्रॅप म्हणजे तुमची फसणूक, ही फसवणूक झाल्यानंतर होण्याची भीती मनात न ठेवता, पोलीस स्टेशन गाठा, आणि सत्य काय आहे ते सांगा, पण कुणालाही पैसे देण्यास बळी पडू नका. हनी ट्रॅप मध्ये शेवटी शेवटी एवढ्या पैशांची मागणी केली जाते की, ती तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. तेव्हा अनेक जण आत्महत्या या पर्याय स्वीकारतात. या पर्याय अतिशय चुकीचा आहे. यामुळे तुमच्या परिवारातील लोकांना आयुष्यभर याची शिक्षा भोगावी लागते.
चिंतेची बाब आता अशी आहे की, बुलढाणासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही हनी ट्रॅप सारख्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या पहुरजीरा या गावात घडलाय. सुटाळा या गावात आपल्या दोन मुलींसह राहत असलेल्या एका विधवा शिक्षिकेने प्रभुदास बोळे यांच्यासोबत ओळख केली. यानंतर त्याला व्हिडिओ कॉल आणि ऑनलाइन चॅटिंग या विधवा शिक्षिकेने सुरु केली, ती प्रभुदास यांच्या घरी देखील येत होती. पण काही दिवसानंतर या शिक्षिकेने बोळे यांना फ्लॅट घेण्यासाठी पैशाची मागणी सुरू केली. त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली , त्यामुळे प्रभुदास वैतागून गेले होते, असे त्याच्या पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे.
ही शिक्षिका पैशासाठी मला ब्लॅकमेल करत असल्याने आपण आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज आत्महत्येपूर्वी बोळे यांनी आपल्याला पाठवला असल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. पोलीस तपासात देखील शिक्षिका पैशासाठी तगादा लावत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या शिक्षिकेला अटक केली आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या आत बुलढाणा जिल्ह्यात ही दुसरी घटना घडली आहे. पहिल्या घटनेत हनी ट्रॅपमागे आख्खी गँग असल्याचं समोर आलं होतं. तेव्हा देखील मैत्री करुन व्हीडिओ काढून, व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी एका महिलेने दिली होती
माझ्या मैत्रिणीला ब्युटी पार्लर काढायचे आहे. यासाठी २५ लाख रुपये दे अशी या महिलेची मागणी होती, असा आरोप तक्रारीत होता. या प्रकरणी महिलेसह २ तरुणांना अटक करण्यात आली होती. ही दुसरी घटना देऊळगाव राजा येथील होती.
आधुनिक ऑनलाईन हनीट्रॅप
‘फोन पर करो सेक्सी बाते’ ‘खुले विचार रखनेवाली लडकी से चॅटींग’ ‘सेक्सी व्हिडीओ चॅटींग’ अशा प्रकारे जाहिरातीकरून लोकांना जाळ्यात ओढलं जातं. त्यानंतर त्यांच्या कामूक भावना उत्तेजित करून त्यांचे आपत्तीजन व्हिडीओ तयार केले जातात. या व्हिडीओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. हा ऑनलाईन हनी ट्रॅपचा नवा प्रकार सध्या सुरू झाला आहे. अशा प्रकारचे हनी ट्रॅप कित्येकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरून चालवले जाणारे असतात. एवढंच कशाला व्हॉट्स ऍप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना स्वतःच्या गुप्तांगांचे फोटो पाठवण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातून सुद्धा ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडत आहेत. हा हनी ट्रॅपचा अधुनिक अवतार आहे. त्यामुळे नेटवर पॉर्न पाहतांना, सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी चॅटींग करतांना तुम्ही हनी ट्रॅपमध्ये तर फसत नाही आहात ना याची काळजी घ्या.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदलले आहे. यापूर्वी ‘हनी ट्रॅप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्यायचे. मात्र, आता फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते. प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा एखाद्याला जाळ्यात अडकवले जाते. नालासोपाऱ्यातून अशाच एक प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या तरूणीने नालासोपाऱ्यातील एका तरूणाला हनी ट्रपमध्ये अडकवून त्याच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली आहे. मात्र, नकार मिळताच तरूणीने संबंधित तरूणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्यानंतर तरूणाने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दिल्लीतील तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम, ऑर्कुटवरून मैत्रीचा संदेश देऊन ,किंवा तुमच्या परिचयाचा उल्लेख करून अनेकदा ऑन लाईन फसवणुकीचे सर्रास प्रकार सुरू आहेत.एकदा ओळख झाली की त्या ओळखीचे रूपांतर प्रेम प्रकरणात करून नको त्या अश्लील चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग करून नको त्या अवस्थेचे फोटो मागवून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार सध्या शोधलं माध्यमावर सुरू आहेत.पैसे उकळण्यासाठी असे सर्व प्रकार केले जातात.तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा, तर कधी पाठवलेल्या न्यूड फोटोंच्या बदल्यात खंडणी मागितली जाते.ओळखी व्यक्तीचा मेसेज आल्यानंतर शहानिशा केल्यानंतर त्याला आपली माहिती देऊ नये.चाट करण्याच्या मोहात पडू नये, वयक्तिक माहिती देऊ नये,सतत चाट करत असेल तर त्याला ब्लॉक करणे,आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर ही संपूर्ण माहिती पोलिसांना देऊन पोलिसांचे संरक्षण प्राप्त करून घेतले पाहिजे.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आलं होतं. हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.
हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार या सर्वांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याची अनेक उदाहरण सापडतील. सेक्स व्हिडीओ, अश्लील चॅट या सगळ्यांवरुन या दरम्यान ब्लॅकमेलिंग केलं जातं. राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रांत हनी ट्रॅप चालतं. गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी याचा वापर होतो. हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो.