अर्थ-उद्योगआरोग्य

‘बेस्ट’ उद्यापासून पूर्ण आसनक्षमतेने धावणार; मुंबईकरांना दिलासा

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारने मुंबईसह अनेक शहारांमधील निर्बंध ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शिथिल केले आहेत. यात मुंबईकरांसाठी राज्य सरकारने काही प्रमाणात दिलासाजनक बातमी दिली आहे. लोकलनंतर मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट बसमधून आता पूर्ण आसनक्षमतेनुसार वाहतूक करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर आता सोमवारपासून (७ जून २०२१) बेस्ट बसेस पूर्ण प्रवासी वाहतूक करु शकणार आहे. त्यामुळे दररोज बेस्ट बसने प्रवास वैतागलेल्या मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालविल्या जाणार आहेत. राज्य सरकारने बेस्टला परवानगी देताना करोना संसर्गाच्या अनुषंगाने काही बंधने घातली आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बसेसमध्ये मुंबईकर प्रवाशांनी प्रवास करताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर असे लावावा अशी विनंती बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button