अटल इनोव्हेशन मिशनचा आरोग्यसेवा व कृषी नवोन्मेष्काराप्रती कार्य करण्यासाठी बायरसोबत सहयोग
मुंबई : अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आणि बायर ही भारतामध्ये १२५ वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत असलेली जागतिक जीवन विज्ञान कंपनी देशभरात नवोन्मेष्कारी व उद्योजकता उपक्रमांना चालना देण्याच्या मिशनप्रती काम करण्यासाठी एकत्र आले आहेत.
एआयएम व बायर यांच्यामधील धोरणात्मक भागीदारीच्या स्टेटमेण्ट ऑफ इंटेण्टवर (एसओआय) सहयोगाला अधिकृत रूप देण्यासाठी स्वाक्ष-या करण्यात आल्या आणि कराराची प्रत एकमेकांना देण्यात आल्या. या एसओआयमध्ये विज्ञान शिक्षणाला चालना, पुरवठा साखळी प्रबळ करण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्स व कृषी-तंत्रज्ञानाला प्रगत करणे, तसेच आरोग्यसेवा प्रकल्पांचा समावेश असेल. तसेच बायर एआयएमसोबत त्यांच्या विद्यमान व भावी उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि कृषी व आरोग्यसेवा विभागांमध्ये नवोन्मेष्कार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी सहयोग करेल.
एआयएमचा प्रमुख उपक्रम ‘अटल टिंकरिंग लॅब्स’ (एटीएल)ने शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व कल्पनाशक्तीला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बायर या संधींचा लाभ घेत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल, त्यांच्यामध्ये डिझाइनबाबत विचारसरणी, समस्या निवारण व सर्वोत्तम अध्ययन कौशल्ये बिंबवण्याचा प्रयत्न करेल. तसेच परस्पर सहमती असलेल्या शाळांना पाठिंबा देण्यासोबत त्यांचा अवलंब करेल. याव्यतिरिक्त ‘अटल इन्क्युबेशन सेंटर्स’ (एआयसी) व ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स’ (एसीआयसी)चा भाग म्हणून बायर तरूण प्रवर्तक व स्टार्ट-अप्सना मार्गदर्शन करेल आणि भावी नवोन्मेष्कारासाठी त्यांच्यासोबत सहयोग करेल. भविष्यात बायर कृषी व आरोग्यसेवा विभागांमधील डिजिटल सोल्यशून्सच्या क्षेत्रातील एएनआयसी व एआरआयएसई उपक्रमांशी संबंधित टेक्नोप्रीन्युअर्ससोबत देखील सहयोग करेल.
निती आयोगच्या एआयएमचे मिशन संचालक आर. रामाणन बायरसोबत व्हर्च्युअली एसओआयची देवाणघेवाण करत म्हणाले, ”बायरसोबतचा सहयोग अटल इनोव्हेशन मिशनसाठी स्वाभाविकच आहे. दोघांची विशेषीकृत, कृषी व आरोग्यसेवा क्षेत्रे राष्ट्रीय प्राधान्यक्रम असलेली क्षेत्रे आहेत. विशेषत: महामारीच्या काळामध्ये ही क्षेत्रे खूपच उपयुक्त ठरली आहेत. आमचा या क्षेत्रांवर विशेष फोकस आहे. मला विश्वास आहे की, आगामी काळामधील हा अत्यंत फलदायी संबंध असणार आहे.”
बायरचे दक्षिण आशियातील वरिष्ठ प्रतिनिधी आणि बायर क्रॉपसायन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नारायण म्हणाले, ”बायरला अटल इनोव्हेशन मिशन, निती आयोगासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही भारतातील कृषी व आरोग्यसेवा विभागांमध्ये नवोन्मेष्कार व उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आम्हाला ‘अटल टिंकरिंग लॅब्स’ उपक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करण्याच्या अनेक संधी मिळतील. ज्यामुळे मूल्य साखळींमधील डिजिटल सोल्यूशन्सना चालना मिळेल आणि उदयोन्मुख स्टार्ट-अप्ससोबत सहयोग करता येईल. सध्याच्या अवघड काळादरम्यान उद्योजकता व विज्ञान-नेतृत्वित नवोन्मेष्कार शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याप्रती आमच्या प्रगतीला चालना देण्यामध्ये आणि भारतभरात आरोग्य उपाययोजना उपलब्ध करून देण्याच्या प्रमाणात वाढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.”
डिजिटायझेशनवरील फोकसच्या माध्यमातून बायरचा आरोग्यसेवा व कृषीसाठी मापनीय, सर्जनशील तंत्रज्ञान सोल्यूशन्सना चालना देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे शेवटच्या अंतरापर्यंत पोहोच वाढवता येईल. आरोग्यसेवा व कृषीमधील अशाप्रकारच्या तंत्रज्ञान नवोन्मेष्कारांचा दुर्गम व ग्रामीण भागांमध्ये राहणा-या लोकांना लाभ होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळण्यासोबत उदरनिर्वाहामध्ये साह्य मिळू शकते.
एआयएम बाबत
अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) हा आपल्या देशाच्या कानाकोप-यापर्यंत नवोन्मेष्कारी व उद्योजकता संस्कृती निर्माण करण्यासोबत तिला चालना देणारा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे. एआयएमचा अर्थव्यवस्थेच्या विविध विभागांमध्ये नवोन्मेष्काराला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम व धोरणे निर्माण करण्याचा, विविध भागधारकांना व्यासपीठ व सहयोग संधी देण्याचा आणि देशाच्या नवोन्मेष्कारी व उद्योजकता इकोप्रणालीवर देखरेख ठेवण्यासाठी एकसुत्री संरचना निर्माण करण्याचा मनसुबा आहे. एआयएमच्या उपक्रमांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदानात्मक भूमिका बजावली आहे, ज्यामुळे भारताचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधील क्रमांक २०१५ मधील ८१व्या स्थानावरून २०२० मध्ये ४८व्या स्थानावर आला आहे.
एसआयएमने सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळींवरील शाळा, विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योगक्षेत्र, एमएसएमई, एनजीओ, मंत्रालयांचा समावेश आहे.