Top Newsआरोग्य

आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे अनावरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लाँच केलं. या मोहिमेसाठी सरकारनं ऐतिहासिक करार केला आहे आणि याअंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे हेल्थ आयडी असणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असे आणि ते आधार कार्डाप्रमाणेच दिसणार आहे. या कार्डावर एक आधार प्रमाणेच नंबरही असेल. याद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल.

गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज तो एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मोहिमेची सुरूवात करण्यात येत आहे, ज्यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल आणण्याची ताकद आहे,” असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. “डिजिटल इंडिया या मोहिमेनं सामान्यांची ताकद अधिक वाढवली आहे. आज आपल्या देशातत १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल वापरकर्ते, ८० कोटी इंटरनेट वारकर्ते आमि ४३ कोटी जनधन बँक खाती आहेत. असं जगात अन्य ठिकाणी कुठेही नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळाली. यासोबत सर्वांना देशात मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसही देण्यात येत आहे. आतापर्यंत ९० कोटी लोकांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यामध्ये कोविनची मोठी भूमिका आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

हेल्थ आयडी तयार करण्याची पद्धत

पब्लिक कम्युनिटी हॉस्पीटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, हेल्थ अँड वेलनेस सेंटर किंवा असा हेल्थकेअर प्रोवाडर जो नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडलेला असेल, ते कोणत्याही व्यक्तीचा हेल्थ आयडी तयार करू शकातात. याशिवाय https://healthid.ndhm.gov.in/register या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही नोंदणीही करू शकता आणि आपलं हेल्थ आयडी तयार करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button