ऑडी क्यू७ आता भारतात लॉन्च
मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये आयकॉनिक ऑडी क्यू७ च्या लाँचची घोषणा केली. कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन असलेल्या नवीन ऑडी क्यू७ मध्ये गतीशील ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय इंजिन आहे. या मोठ्या एसयूव्हीमध्ये ऑडी ‘क्यू’ समूहाची नवीन डिझाइन असण्यासोबत उच्च गतीशीलता व सर्वोत्तम आरामदायीपणा आहे. तसेच या कारमध्ये अधिक एैसपैस जागा व वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये देखील आहेत. ऑडी क्यू७ प्रिमिअम प्लस व्हेरिएण्ट रुपये ७९,९९,०००/- (एक्स-शोरूम) तर ऑडी क्यू७ टेक्नोलॉजी व्हेरिएण्ट रुपये ८८,३३,०००/- (एक्स-शोरूम) मध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, भारतातील अत्यंत लोकप्रिय ठरलेली कार लाँच करत वर्षाचा शुभारंभ करण्यासारखा दुसरा सर्वोत्तम मार्ग कोणताच नाही. ऑडी क्यू७ अनेक वर्षांपासून आमच्या क्यू-रेंजची आयकॉन राहिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन लुक व अद्ययावत वैशिष्ट्यांनी युक्त नवीन मॉडेल ट्रेलब्लेझर ठरेल. ऑडी क्यू७ ची ऑन-रोड व ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्यक्षमता प्रमुख पैलू आहे, जो कारला इतरांपेक्षा वरचढ ठरवतो.
धिल्लों पुढे म्हणाले, वर्ष २०२२ मध्ये उच्च आकारमानाच्या मॉडेल्ससोबत काही उच्चस्तरीय उत्पादने लाँच करण्यात येतील. वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओसह आम्ही वर्ष २०२२ दरम्यान प्रबळ विक्री कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. अधिक सोयीसुविधा सादर केल्या जाणार आहेत आणि आज ऑडी इंडियासाठी आणखी एका उत्तम वर्षाची सुरूवात आहे.
कार्यक्षमता व ड्रायव्हिंग क्षमता:
– ३.० लिटर व्ही६ टीएफएसआयसह ४८ व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टिम ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्कची निर्मिती करते.
– माइल्ड हायब्रिडमध्ये ४८-व्होल्ट इलेक्ट्रिकल सिस्टिम आहे, जी बेल्ट अल्टरनेट स्टार्टरला (बीएएस) पुरेशी शक्ती देते. ही सिस्टिम इंजिनला कोस्टिंगच्या वेळी जवळपास ४० सेकंदांपर्यंत बंद ठेवते. बीएएस सिस्टिम मागणीनुसार आपोआपपणे वेईकल पुन्हा सुरू करते.
– २५० किमी/तास या अव्वल गतीसह ऑडी क्यू७ ५.९ सेकंदांमध्ये ०-१०० किमी/तास गती प्राप्त करते.
– दिग्गज क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह सात ड्राइव्ह मोड्सच्या (ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएन्सी, ऑफरोड, ऑल-रोड व इंडिव्हिज्युअल) परिपूर्ण संयोजनासह ऑडी क्यू७ अद्वितीय ड्राइव्ह अनुभव देते.