Top Newsराजकारण

वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांचा पलटवार

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर ड्रग्ज कारवाई आणि वानखेडेंवर करण्यात येणाऱ्या आरोपांवरुन नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरण हे नवाब मलिकांचे षडयंत्र आहे. तर ड्रग्ज प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड हा सुनिल पाटील असून त्याचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करत मोहित कंबोज यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतील सदस्याने पत्रकार परिषद घेऊन लोकांचे लक्ष विचलीत आणि दिशाभूल करण्यात आली आहे. परंतु यामध्ये फारसे यश येणार नाही. रविवारी मी याबाबत खरं खोटं जनतेसमोर आणणार, अशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक उद्या म्हणजेच रविवार ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ललित हॉटेल आणि भाजपचे कनेक्शन काय आहे? याबाबतचा खुलासा कऱणार आहेत. नवाब मलिकांनी ड्रग्ज प्रकऱणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मलिक आता कोणता खुलासा करणार आणि कोणावर निशाणा साधणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button