कमल हासन यांच्या गाडीवर अज्ञाताचा हल्ला
कांचीपूरम : तामिळनाडूनमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून प्रचार सभा, भव्य रॅली आयोजिल्या जात आहेत. यातच तामिळनाडूच्या कांचीपूरम भागात मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते अभिनेते कलम हसन यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त समोर येत आहे. कमल हासन प्रचारानंतर कांचीपुरमधून चेन्नईच्या दिशेने जात असताना एका तरुणाने हासन यांच्या गाडीवर हल्ला चढवला. हल्लेखोर तरुण हा मद्यधुंद अवस्थेत होता. तो कमल हासन यांचा चाहता असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने हासन यांना भेटण्यासाठी गाडीचा दरवाजा जबदरस्तीने खोलण्याचा प्रयत्न केला. या हल्लात हासन यांनी सुदैवाने कोणतीही इजा झालेली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.
यावेळी हासन यांच्यासोबत उपस्थित कार्यकर्त्यांनी हल्लेखोर तरुणाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. कार्यकर्त्यांच्या मारहाणीत हल्लेखोर तरुणाच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले व त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भर्ती केले. तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांवर ६ एप्रिलपासून मतदान होणार आहे. कलम हासन यांच्या मक्कय निधी मय्यम पक्षाने आपले १५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यात कमल हासन कोयम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. त्यामुळे तामिळनाडू विधानसभेत पक्षाच्या अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी हासन यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकांचा निकाल २ मे २०२१ रोजी लागणार आहे.