राजकारण

मराठा आरक्षण कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीचे नाही; अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2021) वाद पेटला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. पण, खोटे बोल पण रेटून बोला असं फडणवीसांचं आहे, असा जोरदार पलटवार चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधाने चुकीची आहेत. ‘खोटे बोल पण रेटून बोला अशा प्रकारचे त्यांचे विधान आहे. मी कोणतीही चुकीची माहिती विधानसभेत दिलेली नाही. मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे हीच आमची भावना आहे, असं अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
‘सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने जी भूमिका मांडली, तेच मी विधानभवनात सांगितले. फडणवीस म्हणतात की, तो जुनाच कायदा आहे व 102 ची घटनादुरूस्ती लागू होत नाही. मग केंद्र वेगळी भूमिका का घेत आहे? असा सवालच चव्हाण यांनी उपस्थितीत केला.

‘आरक्षण हा राजकीय पक्षाच्या मालकीचा विषय नाही. तेव्हा सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. राजकारण करू नका. लोकांना उसकवण्याचे काम करू नये भाजपनं राज्यात एक व केंद्रात दुसरी भूमिका घेवू नये. हक्कभंगाला मी उत्तर देईन’ असे प्रत्त्युत्तर चव्हाण यांनी दिले.

दरम्यान, ‘सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षण संदर्भात खोटे निवेदन केले. 102 ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. अॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे’, असं फडणवीस यांनी जाहीर केलं.
‘मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना अॅटर्नी जनरलनी पाठिंबा दिला. अॅटर्नी जनरलच्या विरोधात चुकीची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आमच्या सरकारच्या काळात केलेला कायदा कसा निरस्त आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असंही फडणवीस म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button