राजकारण

नाशकात पार्किंगची सोय करा, मगच वाहनांवर कारवाई करा; युवक राष्ट्रवादी आक्रमक

नाशिक : शहरात आधी अधिकृत पार्किंग तयार करा, मगच वाहणारे उचलून नेण्याची कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना दिला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेजवळ वाहनतळ नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यामुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. अशी वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलून नेली जातात व दंड वसूल केला जातो. दंडाच्या नावाखाली काही टोइंग कर्मचाऱ्यांनी आपला धंदा सुरु केला असून यामुळे सरकारी तिजोरीवर याचा फटका बसत आहे. वाहनतळ नसल्याने अनेक वाहने रांगेत रस्त्याच्या कडेला उभी असल्याने टोइंग कर्मचारी एकही वाहन न सोडण्याच्या लोभामुळे घाईगर्दीने वाहने चुकीच्या पद्धतीने टोइंग करतात. यामुळे अनेक वाहनाने नुकसान होते. वाहनधारकाने याबाबत जाब विचारल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावीची भाषा करतात. कोरोनामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला असताना टोइंगच्या भीतीने ग्राहक खरेदी करता जात नाहीत.

नाशिक शहरात रस्त्यावर वाहनतळ सुरु करण्याचा गाजावाजा स्मार्ट सिटीने केला. परंतु सद्यस्थितीत महापालिकेचे अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनधारक संभ्रमात पडले आहे. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेजवळ अधिकृत वाहनतळ उभारल्यानंतरच वाहन टोइंग सुरु करावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोइंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करून अनधिकृत टोइंगच्या नावाखालील धंदा बंद करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button