Top Newsस्पोर्ट्स

पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव; सोमवारी नामकरण

पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्राच्या कारकीर्दीत आता आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राच नाव दिलं जाणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी हा नामकरण सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर टोकिओ ऑलिम्पिकमधे पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा यावेळी सत्कारही करण्यात येणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोमवारी सकाळी पुण्यात येणार आहेत. ते आधी लष्कराच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणार असून त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आर्मी स्टेडीयमचा नामकरण सोहळा होणार आहे.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ट्रॅक आणि फील्ड ॲथलेटिक्समध्ये भारताकडून पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. टोकिया ऑलिम्पिकमध्ये नीरजनं ८७.८८ मीटर भाला फेकत ऐतिहासिक कामगिरी केली. तब्बल १३ वर्षानंतर, म्हणजे २००८ बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. तर वैयक्तिक प्रकारात भारतासाठी हे केवळ दुसरं सुवर्ण पदक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button