राजकारण

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा?; केतन तन्नांचा पाच तास जबाब

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस स्थानकात परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. केतन तन्ना यांच्याकडून तब्बल पाच तास जबाब नोंदवून घेण्यात आला. आणखी चौकशी करून परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मोक्का कायद्या अंतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यवधी रुपये वसूल केल्याचा आरोप तन्ना यांनी केला होता. त्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी ठाणे नगर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या पत्नीसह जबाब नोंदवला आहे. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ख्याती मिळवलेल्या प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून १ कोटी १८ लाख रुपये उकळल्याचा देखील जबाब देखील तन्ना यांनी नोंदवला आहे.

परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे, एन टी कदम, विकास दाभाडे या सगळ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकले असल्याचा आरोप केतन तन्ना आणि सोनू जालान या दोघांनी केला आहे. सध्या तरी राजकुमार कोथमिरे यांची बदली गडचिरोली येथे झाली असली तरी त्यांच्याविरोधात देखील आपण तक्रार दिली असल्याचे जालान यांनी सांगितले.

विमल अगरवाल, जुबेर अन्सारीसारखे पोलिसांचे एजन्ट ही सगळी वसुली करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांना मदतीचे आवाहन दिल्यावर सगळी सूत्र हलून आपल्याला आज न्याय मिळेल अशी अपेक्षा जलान आणि केतन तन्ना यांनी व्यक्त केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button