नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
उद्या २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण १२८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सीडीएस बिपीन रावत यांना मरणोत्तरत पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, गायक सोनू निगमला पद्मश्री, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचेही गेल्या वर्षी निधन झाले.
याशिवाय नीरज चोप्रा यांना पद्मश्री, सायरस पुनावाला यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर मायक्रोसोफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचाई या दोन्ही अमेरिकन पण मूळच्या भारतीय व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
उद्योजक नटराजन चंद्रशेखरन – पद्मभूषण पुरस्कार
डॉ. हिम्मतराव बावसकर, सुलोचना चव्हाण, सोनु निगम – पद्मश्री पुरस्कार
विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल – पद्मश्री पुरस्कार जाहीर
दिवंगत डॉ. बालाजी तांबे – पद्मश्री
व्हिक्टर बॅनर्जी – पद्मभूषण पुरस्कार
पद्मश्री
हिमंतराव बावसकर- औषध निर्मिती
सुलोचना चव्हाण- कला
सोनू निगम- कला
अनिल राजवंशी- विज्ञान आणि अभियांत्रिकी
भिमसेन सिंगल- औषध निर्मिती