राजकारण

३०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी अनिल परब यांच्या चौकशीचे आदेश; क्राईम ब्रॅंचकडे तपास

नाशिक : नाशिक विभागासह राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप याच विभागातील एका मोटार वाहन निरीक्षकाने केला आहे. त्यावरुन पंचवटी पोलिसांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारावर चौकशी सुरू केली आहे. आरटीओ विभागातील (प्रादेशिक परिवहन) निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री परब यांच्यासह ६ बड्या अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार पंचवटी पोलिसांत केली होती. गजेंद्र पाटील हे नाशिकला मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहूनच ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि विभागीय कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, मुंबईतील परमबिरसिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून अत्यंत सावधगिरीने हे प्रकरण हाताळले जात आहे. या प्रकरणामुळे प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पांड्येय यांनी याप्रकरणाची पुढील ५ दिवसांत चौकशी करुन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड हे या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

गजेंद्र पाटील यांनी एक तक्रार दाखल करत परिवहन विभागात सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत आरोप केले आहेत. या आरोपात परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्तांचे नाव घेतले आहे. ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये होणारे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यासाठीचे आरोप आहेत. परिवहन विभागाअंतर्गत कशी पैशांची वसुली केली जाते. गजेंद्र पाटील यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले आहे. तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहूनच डीसीपी क्राईम यांच्यासह आणखी दोन डीसीपी या संपुर्ण प्रकरणामध्ये चौकशी करत आहेत. या तक्रारीची लेखी प्रत गजेंद्र पाटील यांना देण्यात आली आली असून चौकशीचे आदेश झाले आहेत. त्यांची तब्येत २७ मे हायकोर्टात रिट याचिकाही दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली. येत्या ३१ मे रोजी गजेंद्र पाटील चौकशीसाठी हजर राहणार आहेत असेही ते म्हणाले.

अनिल परब यांचा दावा

निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर ५ अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून, उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button