मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याआधी परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा यांनी सोमय्यांना दिला होता. ३ दिवसात माफी मागा नाहीतर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन, अशी नोटीस अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना बजावली होती. सोमय्या जाहीरपणे आपली वारंवार बदनामी करत असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला होता.