राजकारण

अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांची आज ईडीकडून चौकशी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी शुक्रवारी ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. दीपावली पाडव्याच्या दिवशीच त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे.

आज ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारतील. त्यांच्याकडून अनेक प्रश्नांचा उलगडा होईल, असे प्रश्न ईडीचे अधिकारी ऋषिकेश यांना विचारतील. कथित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप केले होते. याच घोटाळ्यावरुन त्यांना ईडीन अटक केलीय. पण या प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. याच समितीसमोर परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझ्याकडे देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाहीय, असं त्यांनी म्हटलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असणारे देशमुख १ नोव्हेंबर रोजी अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास १३ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडीने त्यांना अटक केली. न्यायालयानेही देशमुख यांना धक्का देत त्यांची रवानगी ईडी कोठडीत ६ नोव्हेंबरपर्यंत केली आहे. म्हणजेच दिवाळीचा संपूर्ण आठवडा त्यांना तुरुंगात काढावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button