Top Newsराजकारण

…आणि अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर टाकली मांड !

पुणे : बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना म्हणाले होते. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. आज अखेर अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शब्दला सत्यात उतरवले आहे.

पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बैलगाडा शर्यतीला अतिशय उत्साही वातावरणात सुरुवात झाली. गावातील असंख्य नागरिकांनी शर्यत बघण्यासाठी गर्दी केली होती. या शर्यतीत अमोल कोल्हे यांनी तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो असे सत्यात उतरवून दाखवले आहे.

लोकसभेच्या निवडणुक प्रचारादरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. ‘खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेंना निमंत्रण धाडलं अखेर आढळराव पाटलांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती पार पडल्या. त्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. यामध्ये एकूण ३५० बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. इतकच नव्हे तर बैलगाडा शर्यतीवरुन शिरून मतदारसंघातून विरोधक शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानालाही चोख उत्तर दिले आहे. यातूनच शिरूर मतदार संघात बैलगाडा शर्यतींवरून राजकीय वाद रंगल्याचे चित्र दिसून आले आहे. यापूर्वी शिवसेने नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लांडेवाडी येथे भव्य अशी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती.

आढळरावांनी दिले होते आव्हान लोकसभेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन खासदार कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. ‘खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे त्यांनी म्हटलं होत. अमोल कोल्हे यांनीही रुबाबदार एंट्री मारत घोडी धरून आढळराव पाटलांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

जिल्ह्यात पहिली शर्यत झाली, तेव्हा संसदेतअधिवेशन सुरु होत. ज्यांची संसदेतील उपस्थितीच ५०-५५ टक्के आहे. १५ वर्षाच्या कालावधीत ज्यांना आपल्या भाषणातून एकदाही छाप पाडता आली नाही. अश्या लोकांच्या आक्षेपाला उत्तर देणे मला स्वागर्ताह वाटत नाही. बसायचं असत तर तिकडेही बसू शकलो असतो. पण तिकडे बसलो असतो तर त्यांना जास्त त्रास झाला असता. अन वयोमानापरत्वे त्यांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा होती, असा टोला डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे . शर्यत सुरु झाली ही खरचं खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे, महाविकास आघाडी सरकारचे मी मनापासून आभार मानतो. यामुळे बैल बाजारातील बैलाची खरेदी विक्री सुरु झाली. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर बैलगाडा शर्यतीला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button