साहित्य-कला

आनंद अंतरकर यांचे निधन

पुणे : ‘हंस’, ‘मोहिनी‘ आणि ‘नवल‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे आज शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. आनंद अंतरकरांच्या निधनाने उत्तम सजावट आणि अनुभवी तसेच नवोदित लेखकांच्या कसदार साहित्याने नटलेल्या मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आले आहे.

साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (ग. दि. माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी आहेत. रूग्णालयात जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बव्हंशी पूर्ण केले होते. ७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोहचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button