Top Newsराजकारण

सर्व राज्यांना नोव्हेंबरमध्ये अतिरिक्त ४७,५४१ कोटी रुपये मिळणार : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की, या महिन्यात राज्यांना खर्चासाठी ४७,५४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. त्या म्हणाल्या, राज्यांना ४७,५४१ कोटी रुपयांची सामान्य रक्कम देण्याऐवजी, २२ नोव्हेंबर रोजी एक महिन्याचा आगाऊ हप्ताही दिला जाईल. अशा प्रकारे, त्या दिवशी राज्यांना एकूण ९५,०८२ कोटी रुपये दिले जातील. त्या म्हणाले की एक महिन्याचा आगाऊ हप्ता मिळाल्याने, राज्यांना भांडवली खर्चासाठी अतिरिक्त निधी मिळेल, ज्याचा वापर ते पायाभूत सुविधांच्या उभारण्यासाठी होईल.

निर्मला सीतारामन यांनी कोविड महामारीनंतरच्या आर्थिक सुधारणांच्या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत १५ राज्यांचे मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री आणि इतर राज्यांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button