इतर
गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु असतानाच अजय आंबेकर स्वेच्छानिवृत्त
मुंबई : माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर यांची जाहिरात गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु असतानाच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर यांनी राज्य सरकारकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो अर्ज सरकारने स्वीकारला आहे. आंबेकर यांच्यावर माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या जाहिरातींसंदर्भात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी अद्याप सुरु आहे. ही चौकशी प्राथमिक स्तरावर आहे. तरीही त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. मात्र चौकशीनंतर ते दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाईस ते पात्र असतील असे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.